• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ही वनस्पती म्हणजे सापांचं हक्काचं घरच, हमखास साप आढळणार, गारुडी सुद्धा झाड लावण्यास घाबरतात, तुमच्या घरात आहे का?

June 3, 2026 by admin Leave a Comment


पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाचं पाणी सापांच्या बिळात घुसतं, त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. पावसाचं पाणी बिळात शिरल्यामुळे साप आधीच घाबरलेले असतात, त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. भारतात दरवर्षी हजारो व्यक्तींचा सापांमुळे मृत्यू होतो. हा मृत्यू केवळ साप चावल्यामुळे होत नाही, तर अशा व्यक्तीला वेळेत उपाचर न मिळू शकल्याने मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्पदंशानंतर अशा व्यक्तीला तातडीने उपचार मिळून देणं हाच सर्पदंशावरील उपाय आहे.

दरम्यान अनेकांना बाग कामाची आवड असते, अनेक लोक पावसाळ्यात मोठ्या हौशेन बागेत विविध प्रकारची झाडं लावतात, ज्यामध्ये विविध प्रकारच्या सुवासिक फुलांच्या, फळांच्या झाडांचा समावेश असतो. तर अनेक जण घरात सजावटीसाठी देखील काही विशिष्ट झाडं लावतात. परंतु काही झाडं ही अशी असतात जी सापांना आपल्याकडे आकर्षित करतात, त्यामुळे अशी झाडं लावताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं, अशी झाडं शक्यतो घरापासून थोडी दूर अंतरावर लावावीत आणि या झाडांजवळ जाताना थोडी काळजी घ्यावी, कारण अशा झाडांजवळ साप असण्याची दाट शक्यता असते.

जांभळ्या रंगाच्या विलायचीचे रोप हे एक विशिष्ट प्रकारचे झाडं आहे, हे झाड जास्त वाढत नाही, परंतु याची सावली अत्यंत गार असते, तसेच या झाडामध्ये लपल्यास सापाचे पावसापासून देखील संरक्षण होते, त्यामुळे या झाडाकडे साप आकर्षित होतात. या झाडाखाली अनेकदा साप आढळून आले आहेत, त्यामुळे तुम्हाला जर कधी हे झाड लावायचं असेल तर ते घराच्या थोडं दूर लावावं.

पांढऱ्या रंगाचं स्नेक प्लांट – हे झाड पांढऱ्या रंगाचं असतं, याची पान ही सापाच्या जिभेच्या आकाराची असतात, त्यामुळे याला पांढरा स्नेक प्लांट असं देखील म्हटलं जातं. जिथे दलदलीची जागा आहे, अशा ठिकाणी या झाडाची वाढ होते. हे झाड भारतामध्ये शक्यतो आढळून येत नाही, व्हिवेतनामचं वातावरण या झाडासाठी पोषक असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात ही झाडं आढून येतात, परंतु तेथील लोक हे झाड कधीही घरात लावत नाहीत, कारण यामुळे साप घरात येतात.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!
  • Manoj Jarange Patil : तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या, आम्ही म्हणतो प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे यांची शिष्टमंडळासमोर अट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in