• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हराम$$$…तुझ्या$$$… संजय गायकवाड यांची पुन्हा घसरली जीभ, शिवाजी कोण होता? पुस्तकावरून का हासडल्या शिव्या, तो वाद काय?

April 23, 2026 by admin Leave a Comment


Sanjay Gaikwad on Prashant Ambi over Who is Shivaji Book : काँम्रेड गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक लोकप्रिय आहे. त्यावरून यापूर्वीही वाद पेटला होता. तर आता बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिली. याविषयीची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. या क्लिपवरून आणि पुस्तकावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.

संजय गायकवाड यांची जीभ घसरली

कथित ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर दाखवताना आमदार संजय गायकवाड यांचा तोल गेल्याचे दिसते. या ऑडिओ क्लिपमध्ये ते शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याविषयी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारत आहेत. त्याचवेळी शिव्यांची लाखोली वाहत आहेत. तर जीभ हासडण्याची भाषाही या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. तर प्रशांत आंबी हे त्यांना व्यवस्थित बोलण्याची विनंती करतानाच संताप व्यक्त करताना ऐकू येतात.

संजय गायकवाड यांचा संताप

शिवाजी महाराजांविषयी एकेरी शब्दाचा प्रयोग केला. मी त्यांना हे योग्य वाटतं का असं विचारले. त्यावेळी प्रशांत आंबी मला वेड्यावाकड्या भाषेत बोलले. आम्ही सर्व सहन करू शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधी सहन करू शकत नाही. पानसरे आज हयात आहेत का, त्याने वर जाऊन त्यांना विचारले का? ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही मला असे म्हणत आहेत का? असे त्यांनी मला विचारले. मी त्यांची जात काढली नाही. अशा लोकांना शिव्याच नाही तर जीभही हायडायला हवी. इतका मोठा अपमान करून सुद्धा त्यांची मगरुरीची भाषा दिसली. त्यामुळे मी त्यांना झापले.

प्रशांत आंबी यांची तीव्र प्रतिक्रिया

शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जे शीर्षक आहे, त्यावरून त्यांनी वाद घातला. जवळपास 9 मिनिटं आम्ही बोललो. त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या नावात जे जी आहे. ते आदारार्थीच आहे आणि हा एकेरी उल्लेख नाही. तरीही ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. या नऊ मिनिटात ते मला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. त्यानंतर ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यांना वाचण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना शिवीगाळ करणे आणि जीवे मारणे यामध्येच अधिक रस होता. आपण गायकवाड यांच्याविरोधात कायदेशीर लढा देण्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati Election : ‘तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही, तर भाजपला..’ त्या प्रश्नावर अजित पवार यांच्या सख्ख्या भावाचं परखड मत
  • चिमुरड्यांना दाताने पकडलं, हवेत फिरवलं अन् मग खिळ्यांवर… अकोल्यातील भोंदू बाबाचे अंगावर शहारे आणणारे कृत्य
  • रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी भाषेची सक्ती, हास्यजत्रा फेम दिग्दर्शकचं रोखठोक मत, ‘ऑनलाईन क्लास घ्या आणि…’
  • मोठी बातमी! इराणकडून भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, अख्खी टीमच संपवली, एकही शिल्लक राहिला नाही
  • Central Railway Recruitment: खळखट्याकपूर्वीच मध्य रेल्वे ताळ्यावर, अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना मोठे यश, मराठीविषयी घेतला मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in