• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सूर्याचा का वाढला इतका पारा? भयंकर दुष्काळ, उष्णतेच्या तीव्र झळा, सुपर अल-निनोमुळे का पडला देश काळा-निळा

April 28, 2026 by admin Leave a Comment


Super El Nino: चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. एप्रिलच्या अखेरीसच तापमानात मोठी वाढ झाली असून मे महिन्यातही उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी अमरावतीचा पारा 46 अंशाच्या जवळपास आहे. काल विदर्भात सर्वाधिक अमरावती चे तापमान 46.6° इतके होते. मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून आजही तापमानाने चाळिशी पार केली आहे. नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
आज मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान होते. परभणी आणि नांदेड येथे सर्वाधिक सुमारे 42°C तापमान होते. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि बीड येथे तापमान 41°C च्या आसपास राहील. तर जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही पारा 40°C च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत “रिअल फील” तापमान तब्बल 44°C पर्यंत पोहोचत असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे. यासोबतच उष्ण आणि कोरडे वारे म्हणजेच ‘लू’ देखील वाहत आहेत. सूर्य आग ओकत असल्याने देश जणू काळा निळा पडला आहे. काय आहे हे Super El Nino?

अल निनो आणि सुपर अल निनो आहे तरी काय?

अल निनो ही एक नैसर्गिक घटना आहे. अल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागरातून होते. भूमध्ये रेषेच्याजवळून अल निनो तयार होते. जेव्हा समुद्राचे पाणी अधिक उष्ण, गरम होते. तेव्हा अल निनो तयार होतो. त्याचा परिणाम केवळ समुद्रापूरता मर्यादित नसतो. त्याचा संपूर्ण जगातील हवामानावर परिणाम होतो. जेव्हा तापमान हे 2 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होते. तेव्हा त्याला सुपर अल निनो असे म्हणतात.

भारतावर मोठा परिणाम

अल निनो साधा असेल तर त्याचा परिणाम पावसावर होतो. पाऊस कमी होण्याची दाट शक्यता असते. पण जर सुपर अल निनो असेल तर पावसाचे प्रमाण वाढते. देशभरात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता असते. पण सुपर अल निनो दीर्घकाळ असेल तर भयंकर दुष्काळ पडण्याची भीती वाढते. त्यासोबतच उष्णतेने आगीच्या घटनांमध्ये आणि पाणी साठे संपूर्ण सुखण्याची भीती असते. भारतात वर्ष 1982-83, 1997-98 आणि 2015-16 या काळात सुपर अल निनोचा प्रभाव दिसला.

अल निनो हे नाव आले कुठून?

अल निनो हे स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. त्याला अल निनो असे म्हणतात. त्याचा अर्थ लहान मुलं असा होतो. पेरू आणि इक्वाडोर या देशातील मासेमारी करणाऱ्यांमध्ये हा शब्द प्रचलित आहेत. अचानकपणे समुद्राचे पाणी अपेक्षेपेक्षा जास्त गरम होते आणि सुपर अल निनोचा धोका वाढतो. समुद्र गरम, उष्ण होण्याची घटना ही ख्रिसमसच्या जवळपास सुरू होते. त्यामुळे त्याला एल निनो असे म्हटले जाते. यशू ख्रिस्त यांच्या बालपणाशी त्याचा संबंध जोडल्या जातो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुम हिंदू हो क्या… म्हणत हल्ला करणाऱ्या जैबने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती; मला कुणीच…
  • Video | मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत मांजर पडल्याची सूत्रांची माहिती
  • ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय
  • Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…
  • Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in