• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली ‘काहींना इतरांचा आनंद..’

September 10, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगावकर हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि विविध कलाक्षेत्रांमध्ये काम केलं आहे. मात्र अलीकडच्या काळात सोशल मीडियावर त्यांच्या काही मतांवर किंवा वक्तव्यांवर टीका आणि ट्रोलिंग होताना दिसतं. आता त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने वडिलांवर होणाऱ्या ऑनलाइन ट्रोलिंगवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. श्रियाने सांगितलं की, सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीविषयी मत व्यक्त करणं सोपं असतं. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात त्याच व्यक्तीसमोर गेल्यावर परिस्थिती वेगळी असते. ऑनलाइन टीका करणारे अनेकजण सचिन पिळगावकर यांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतात, असं श्रियाने म्हटलंय.

“जे लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात, तेच लोक प्रत्यक्ष आल्यानंतर फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. लोकांना या गोष्टीचा अंदाज नाही की माझ्या वडिलांनी त्यांच्या इतक्या मोठ्या कारकिर्दीत बरंच काही पाहिलंय आणि शिकलंय. त्यांच्याकडे 60 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. त्यांनी या इंडस्ट्रीला अगदी जवळून पाहिलंय. त्यामुळे जेव्हा त्यांना आयुष्य किंवा करिअरवरून प्रश्न विचारला जातो, तेव्हा ते त्यांचा अनुभव सांगतात. त्यात काहीच चुकीचं नाही. काही लोक फक्त इतरांचं लक्ष वेधण्यासाठी अशा गोष्टी करतात. काहींना इतरांचं यश आणि आनंद बघवत नाही”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

याविषयी ती पुढे म्हणाली, “मनोरंजनसृष्टीत असं बऱ्याचदा पहायला मिळतं, जेव्हा लोक कोणत्याही कलाकाराला इंटरनेटवर ट्रोल करतात, तेच लोक प्रत्यक्ष समोर येताच फोटो किंवा सेल्फी काढायला सुरू करतात. हे एक विचित्र वास्तव आहे. इंटरनेटवर त्या व्यक्तीवर वेगळंच मत पहायला मिळतं. पण प्रत्यक्षात त्यांचं वागणं पूर्णपणे वेगळं असतं.”

विशेष म्हणजे श्रिया स्वतःही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केल्यानंतर तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज आणि रंगभूमीवरही काम केलं आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील सार्वजनिक आयुष्य आणि त्यासोबत येणारी सोशल मीडियावरील मतमतांतरे यांचा तिलाही जवळून अनुभव आहे. वडिलांच्या ट्रोलिंगवर बोलताना श्रियाने त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाकडे लक्ष वेधलं. कलाकारांच्या कामावर मत व्यक्त करणं हा प्रेक्षकांचा अधिकार असला, तरी टीका करताना व्यक्तीचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाचाही विचार व्हायला हवा, असा संदेश तिच्या प्रतिक्रियेतून मिळतो.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Riteish Deshmukh: खिशातून 100 रुपये देणाऱ्या मराठमोळ्या पापाराझीला रितेश देशमुखने शोधून काढलं; केली परतफेड
  • Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
  • नुसतं संगीत ऐकलं तरी लोक ठेका धरतात, 30 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही प्रचंड सुपरहिट
  • CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
  • Virat Kohli: विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? One8 ब्रँडेड बूट किती महाग? पाकिस्तान क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in