• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प यांनी सांगितला असा किस्सा, प्रिन्स चार्ल्सही झाले अवाक्

April 29, 2026 by admin Leave a Comment


Donald Trump-King Charles: ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं व्हाईट हाऊसमध्ये मनापासून स्वागत केलं. मात्र त्यावेळी ट्र्म्प यांनी जे विधआन केलं त्याची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल रंजकपणे बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाने नेहमीच ब्रिटिश राजघराण्याचा आदर केला आहे, पण एकेकाळी त्याच्या आईचं, प्रिन्स चार्ल्सवर क्रश (प्रेम) होता
चार्ल्स जेव्हा तरूण होते, तेव्हा त्यांच्या (ट्रम्प) आईचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. मात्र ट्रम्प यांचं हे विधान ऐकून सगळेच अवाक् झाले आणि ज्यांच्याबद्दल हे बोलल जातं होत, ते चार्ल्स तर लाजून लालबुंद झाले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश राजा चार्ल्स तिसरे यांच्याबद्दल केलेल्या या विधानाने सगळीकडे खळबळ माजली. ट्रम्प यांनी खुलासा केला की त्यांच्या आईचं, चार्ल्सवर प्रेम होत. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले, राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या एका स्वागत समारंभात ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. राजा चार्ल्स (तृतीय), यांच्या पत्नी राणी कॅमिला आणि ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह अनेक वरिष्ठ अमेरिकी आणि ब्रिटिश अधिकारी व राजकारणी पाहुणे, यावेळी उपस्थित होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी चार्ल्स चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?

अमेरिकेत आलेल्या चार्ल्स यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केलं. “कोणत्याही समारंभात किंवा अशाच कोणत्याही प्रसंगी, माझी आई टीव्हीला खिळून बसायची आणि म्हणायची, ‘बघ डोनाल्ड, बघ किती सुंदर आहे,’” असे ट्रम्प म्हणाले. ” तिचं त्या कुटुंबावर खरंच खूप प्रेम होतं, पण मला हेही स्पष्ट आठवतंय की ती म्हणायची, “चार्ल्सकडे बघा, लहानग्या चार्ल्सकडे, तो किती गोंडस आहे.” ती माझी आई होती. माझ्या आईचं चार्ल्सवर प्रेम होतं. तुमचा विश्वास बसेल का?” असा किस्सा ट्रम्प यांनी सांगितला.

अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणार चार्ल्स

ब्रिटनचे राजा असलेले चार्ल्स(तृतीय) हे, अमेरिकन काँग्रेसला संबोधित करतील. ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यांच्या आई, राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी1991 साली अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले होते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या भाषणात दोन्ही देशांच्या सामायिक इतिहासावर आणि त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला होता. चार्ल्स यांच्या भाषणातही याच मुद्द्यांवर भर असण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Assembly Election Exit Poll 2026: आसाम, पश्चिम बंगालसह केरळमपर्यंत… कुणाच्या भाळी विजयाचा टिळा, टीव्ही 9 वर 5 राज्यांचे पोल ऑफ पोल्स पाहा
  • चिमुकलीचे भाषण ऐकून सचिन तेंडुलकरही भारावला, कौतुक करत म्हणाला…
  • UAE OPEC : यूएईच्या निर्णयाने तेल विश्वात उडाली मोठी खळबळ, पण येणाऱ्या दिवसात भारताचा होणार डबल फायदा
  • गगनचुंबी इमारतीत किंचाळ्या घुमल्या, पॉश गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीत बघता बघता भयंकर आग; अनेक मजले धडाधड पेटले
  • ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं 5 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in