
आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे अचानक होणारी वेदना, उलट्या, पोटात गॅस, दातदुखी यावर उपयोगी पडतात. म्हणूनच आपले प्रत्येकाचे स्वयंपाकघर केवळ पदार्थ बनवण्याची जागा नसून ते औषधी वनस्पतींचा खजिनासुद्धा आहेत. आपल्या घरात आपली आजी किरकोळ काही आरोग्याच्या बाबतीत समस्या उद्भवल्यास स्वयंपाकघरात जाऊन नैसर्गिक घटकांनी औषध तयार करून आणते. कारण हेच आरोग्यदायी मसाले आपल्याला आतून निरोगी राहण्यासाठी मदत करतात.
स्वयंपाकघरात असे अनेक गोष्टी आहेत जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात. जर तुम्हाला या गोष्टी कशा वापरायचा हे माहित असेल, तर गरजेच्या वेळी तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही. वारंवार पेनकिलर गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही किरकोळ समस्यांसाठी या घटकांचा वापर केला पाहिजे. चला तर मग वेदनांपासून ते सुज कमी करण्यापर्यंत कोणत्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात आहे आणि त्यांचा वापर कशाप्रकारे करायचा ते जाणून घेऊयात.
हळद वेदनाशामक असते.
हळदीचा वापर हा घरगुती उपचारांमध्ये केला जात आहे आणि हा एक असा मसाला आहे जो जेवणात सहज वापरला जातो. जर तुम्हाला किरकोळ दुखापत झाली असेल आणि सूज व वेदना कमी होत नसतील, तर मोहरीच्या तेल गरम करा आणि त्यात हळद टाका, तेल कोमट करून जखमेवर लावा. रात्री लावून झोपल्यास सकाळपर्यंत जखम व त्यापासून होणाऱ्या वेदनेपासून बरे वाटेल. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते जे वेदना आणि सूज कमी करते. तसेच नियमित हळदीचे दूध प्या कारण यामुळे स्नायूंच्या पेटके आणि वेदनांपासूनही आराम मिळते. याचे इतरही अनेक फायदे आहेत.
लवंगामध्येही भरपूर गुणधर्म असतात
पबमेडनुसार लवंग (सिझिजियम ॲरोमॅटिकम) मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यात युजेनॉल नावाचा घटक असतो, जो वेदनाशामक आहे. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी लवंगाच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून दातावर ठेवा. लवंग तेल उपलब्ध नसल्यास त्याची पूड करून दातावर ठेवा किंवा अख्खी लवंग दातावर दाबून ठेवा.
काळी मिरी
मसाल्यांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. हेल्थलाइननुसार काळ्या मिरीमध्ये दाहशामक गुणधर्म आहेत, ज्यामुळे ती सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. काळ्या मिरीची पूड मधात मिक्स करून प्यायल्याने कोरडा खोकला आणि छातीतील वेदनांपासून आराम मिळतो. तिळाच्या तेलात काळी मिरी पूड टाकून त्याने मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो, तर दुधासोबत त्याचे सेवन केल्याने स्नायू आणि हाडांच्या वेदनांपासूनही आराम मिळतो.
आले
आल्यामध्येही अनेक गुणधर्म आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार आल्यामध्ये असे अनेक घटक असतात जे वेदना, सूज कमी करण्यास आणि वजन नियंत्रण व मळमळ कमी करण्यास मदत करतात. आले तेलात शिजवून ते तेल्याने मसाज केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो, तर पाण्यात उकळून प्यायल्याने सूज कमी होते आणि वजन नियंत्रणात मदत होते. तसेच गॅसमुळे होणाऱ्या पोटदुखी आणि मळमळीपासूनही आराम मिळतो.
सैंधव मीठ
स्वयंपाकघरात आढळणाऱ्या नैसर्गिक वेदनाशामकांबद्दल बोलायचे झाल्यास, सैंधव मीठ देखील अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्हाला दुखापतीमुळे स्नायू दुखत असतील किंवा सूज आली असेल, तर सैंधव मीठ पाण्यात उकळून ते प्रभावित भागावर लावल्यास लक्षणीय आराम मिळू शकतो. ही एक जुनी पद्धत आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
Leave a Reply