
घराच्या मुख्य दरवाजावर लावलेली नेमप्लेट ही केवळ घराची ओळख सांगणारी गोष्ट नाही. वास्तुशास्त्रातील मान्यतांनुसार, नेमप्लेटचे मटेरियल आणि ती कोणत्या दिशेला लावली आहे, याचाही घरातील ऊर्जेशी संबंध मानला जातो. त्यामुळे नेमप्लेट निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे मानलं जातं. लाकडी, धातूची की दगडी..यापैकी कोणत्या मटेरियलची नेमप्लेट कोणत्या दिशेला लावणे शुभ मानलं जातं, चला जाणून घेऊया
लाकडी नेमप्लेट – वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, लाकडाचा संबंध विकास, स्थिरता आणि समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे लाकडापासून तयार केलेली नेमप्लेट घरासाठी शुभ मानली जाते.नेमप्लेट बनवण्यासाठी सागवान, शिसव, महोगनी आणि आंबा यांसारख्या मजबूत लाकडांचा वापर करता येतो. मात्र, केवळ लाकडासारखा दिसणारा प्लायवूड, MDF किंवा प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. लाकडी नेमप्लेटसाठी पूर्व आणि दक्षिण दिशा अनुकूल मानल्या जातात.
धातूची नेमप्लेट – धातूपासून बनवलेल्या नेमप्लेटचा संबंध धन, प्रगती आणि नवीन संधींशी जोडला जातो. पितळ, तांबे, स्टील किंवा लोखंड यांसारख्या धातूंपासून आकर्षक नेमप्लेट तयार करता येते.यामध्ये विशेषतः पितळेची नेमप्लेट शुभ मानली जाते.
वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार, धातूची नेमप्लेट उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावणे योग्य मानले जाते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जात असल्याने, या दिशेला पितळेची नेमप्लेट लावणे धन-समृद्धीसाठी शुभ मानले जाते.
दगडी नेमप्लेट – दगडाचा संबंध पृथ्वी तत्त्वाशी जोडला जातो. त्यामुळे तो मजबुती, स्थिरता आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो. संगमरवर, ग्रॅनाइट किंवा इतर नैसर्गिक दगडांपासून बनवलेली नेमप्लेट मुख्य दरवाजावर लावता येते. मान्यतेनुसार, दगडाची नेमप्लेट नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाशीही जोडली जाते.
दगडी नेमप्लेटसाठी दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशा शुभ मानल्या जातात. विशेषतः दक्षिण-पश्चिम दिशा स्थिरतेशी संबंधित मानली जाते. या दिशेला नेमप्लेट लावल्याने घरातील प्रमुखाची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यतांवर तसेच सामान्य माहितीनुसार आधारित आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचा दावा करण्यात आलेला नाही. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. )






Leave a Reply