• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, राजकारणात मोठी खळबळ

August 19, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.  वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे.  एकाचवेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे बार्शी तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. यापूर्वी निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बार्शी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती.  मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 15 नगरसेवकांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्ष प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं. शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार राहिले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. महायुतीमध्ये राज्यात सर्वाधिक खासदार आता शिवसेना शिंदे गटाकडे आहेत.

दरम्यान विरोधी पक्षातून तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश सुरूच होते, आता महायुतीमधून देखील पक्षप्रवेश होत असल्याचं पहायला मिळत आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान यावर अजून तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये, मात्र अशा पक्षप्रवेशांमुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नकारता येत नाही.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in