• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

July 18, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या जंतरमंतरमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे उपोषणस्तळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील 20 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले होते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचूक यांचं 20 किलो वजन कमी झालं. यामुळे त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाला.

वांगचूक यांनी शुक्रवारी रात्री शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी 20 जुलै रोजी ‘चलो संसद’च्या आंदोलनाचा नारा दिला होता. ‘देशातील कांद्याच्या किंमतीसाठी सरकारला जबाबधार धरण्यात येते. तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभाराविरोधात त्यांनाच जबाबदार धरले पाहिजे. नीट पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्यांवरून सरकारला जबाबदार धरलं पाहिजे, असं सोनम वांगचूक यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं.

सोनम वांगचूक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. देशभरातून सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत होता. नीट पेपर फुटीवरून सरकारने उत्तर द्यायला पाहिजे, राजकीय पातळीवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती.

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, कोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीच्या हायकोर्टात सोनम वांगचूक यांच्या तब्येतीवरून एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं होतं की, सरकारी डॉक्टरांनी सोनम वांगचूक यांची नियमितपणे तपासणी करावी. तसेच डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, आवश्यक ती पावले उचलावीत, असे कोर्टाने नमूद केले होते. दुसरीकडे प्रकृती खालावत असतानाही शुक्रवारी रात्री त्यांनी व्हिडिओ शेअर करत 20 जुलैच्या आंदोलनासाठी आवाहन केलं होतं. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल
  • ‘दायरा’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करीना कपूर भडकली, सँडल दाखवत म्हणाली की…
  • Explainer : आता नेपाळचं व्हायरल घर, तेव्हा केदारनाथचं मंदीर, महाप्रलयात दोघेही शाबूत कसे? वाचा A टू Z
  • पैशासाठी अशा ठिकाणी जाऊ नका.. अर्चना पूरन सिंह यांना ‘लेटेंट’मध्ये पाहून भडकला प्रसिद्ध कॉमेडिअन
  • या वनस्पतीची पानं म्हणजे सापांवर जालीम उपाय; पुडी बांधून फक्त एकदा घरात ठेवा, पुन्हा कधीच साप येणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in