• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाचे विकास लवांडे यांना अटक

May 21, 2026 by admin Leave a Comment


Vikas Lawande : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. दरम्यान, हे प्रकरण मागे पडलेले असतानाच आता लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई नेमकी का करण्यात आली आहे, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी याबाबत नेमके स्पष्टीकरण दिलेले नाही.

अगोदर गुन्हा दाखल, आता थेट अटकेची कारवाई?

विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर घुसखोरी केलेल्या वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. याच प्रकरणामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. याच प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्यात लवांडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. आता लवांडे यांना अटक करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे लवांडे यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याचा दावा शरद पवार यांच्या पक्षाकडून केला जात आहे. लवांडे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांचा एक फोटो समोर आला आहे. ते एका कारमध्ये बसल्याचे दिसत असून त्यांच्या शेजारी पोलीस बसलेले दिसत आहेत

कार्यकर्त्यांना वाघोली पोलीस ठाण्यात जमा होण्याचे आवाहन

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाघोली पोलीस ठाण्यात गर्दी होण्याची शक्यता आहे. अद्याप लवांडे यांना अटक का करण्यात आली याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

दरम्यान, आता या प्रकरणी पुढे नेमकी कोणती कारवाई केली जाणार? शरदचंद्र पवार पक्ष यावर कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच…
  • मोठी बातमी! अखेर 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
  • अभिनेते पंकज त्रिपाठीच्या भावावर प्राणघातक हल्ला, थोडक्यात बचावला… पोलिसांकडून धक्कादायक कारण समोर
  • PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in