
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिश गवांदे, महेबूब शेख, हेमाताई पिंपळे, प्रवीण कुंटे पाटील यांचा समावेश आहे. या सर्व प्रवक्त्यांवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न
समोर आलेल्या माहितीनुसार, आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे नेते हजर होते. यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्रजी शिंगणे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर
राष्ट्रवादीच्या या बैठकीनंतर 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिले. यावेळी पक्ष संघटना आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री अनिलजी देशमुख, माजी मंत्री… pic.twitter.com/amrKQTkiNO
— Supriya Sule (@supriya_sule) August 29, 2026
पक्षाने प्रवक्त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या रद्द
समोर आलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला पक्षाकडून प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शरद पवार यांच्या पक्षाच्या ट्विटर हँडलवर एक पत्र पोस्ट करण्यात आले होते. या पत्रावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची सही होती. या पत्रानुसार ‘शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने, आज दि. 4 ऑगस्ट 2026 पासून यापूर्वी पक्षाच्या प्रवक्तापदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहेत. तसेच, या कालावधीत माजी आमदार मा. श्रीमती विद्या चव्हाण आणि श्री. महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील. याबाबत सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी’ असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पक्षाने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
Leave a Reply