• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे आवाहन, मुंबईत जाण्यासाठी थेट..

August 31, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले. आजापासून मुंबईत दाखल होण्यास सुरूवात करा, असे त्यांनी म्हटले. पुढचे 12 दिवस हळूहळू मुंबईत जा. पोलिसांना कळू देऊ नका. मराठे मुंबईत आलेत हे कोणालाही कळू देऊ नका. सगळे सोबत जाणे शक्य नाही. मी पण हळूहळू मुंबईत येतो. मी आलो की, मग तुम्ही बाहेर पडा. मित्र, नातेवाईकांकडे जा. जर तुम्हाला पोलिसाने पकडून नेले तर घाबरून जाऊ नका. उलट तुमची तिथे जास्त सोय होईल. तुम्हाला कोण नेते ते पण मी बघतो. आझाद मैदानात जाऊ नका. गणपती बघायला, मुंबईतील पाहुण्यांना भेटायला जाऊ शकतात. पण आजपासून मुंबईत जायला सुरूवात करा. सरकारकडून कोणीही संपर्क केला नाही. आमच्या इतके देव देव कोणीही करत नाहीत, ते दीड दिवसाचा गणपती बसवतात. त्यांच्याकोणी जवळचे असतील त्यांना निरोप आला असेल मला तर आला नाही.

मी कालपासून इथून उठलो पण नाही. 24 तास हे सोडून द्या पोरांनो आपले मुंबईचे सुरू करा. आझाद मैदानाकडे जाऊ नका, असेही स्पष्ट शब्दात जरांगे यांनी म्हटले. मी मुंबईत आल्यावर या असेही त्यांनी म्हटले. भाजपामध्ये आलेले लोक जेलमध्ये जाऊ शकत नाहीत, ते संविधानिक आहे. कितीही मोठे खोटाळे केले तरीही. ते दोन संविधान चालवतात.

आपले सोपे करा. आपले हळूहळू 12 तारखेच्या अगोदर मुंबईला जा. मित्राकडे जा. पोलिसांनी धरले तर नीट पोलिस स्टेशनला जा. जे जात आहेत, पुढे त्यांनी झेंडा बांधून जा नका. ते ओळखतात, हळूहळू जा.. माझ्यासोबत थांबू नका. आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बघायचे आहे.

आपल्याला पोलिसांकडे नाही बघायचे, पोलिसांना त्रास देऊ नका. उपोषण मी सोडणार नाही, मी मुंबईतच जाणार. अजिबात आझाद मैदानात आणि वर्षा बंगल्यावर जायचे नाही, त्यांना संशय येणार नाही. नातेवाईकांकडे जा, तिथे जाऊन गप राहा. खूप लोक आपले तिकडे आहेत. एक ते दोन लाख घर आपली तिकडे आहेत. पोलिस काय लय नाहीत, उगाच इथे



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in