• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! भारताचा सर्वात मोठा विजय, भारतात येऊन चीनची पाकिस्तानला मोठी चपराक

September 12, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीमध्ये दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे, आज या शिखर परिषदेचा पहिला दिवस आहे. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात दहशतवादाचा विरोध करण्यात आला आहे. या संयुक्त घोषणापत्रात दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. तसेच ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या देशांनी यावेळी भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र निषेध केला आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमधून देण्यात आला आहे.

या शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान हे देखील सहभागी झाले आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश या शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सदस्य देशांकडून देण्यात आला आहे. तसेच या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा देखील तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला, दरम्यान त्यानंतर भारताने पाकिस्तावर एअर स्ट्राईक केला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील शंभरपेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा संपूर्ण जगासमोर उघड झाला होता. त्यानंतर आता ब्रिक्स परिषदेमध्ये देखील पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कडक पाऊले उचलली जातील असा ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आला आहे. तसेच इतरही अनेक महत्त्वाचे ठराव या परिषदेमध्ये समंत करण्यात आले आहेत. या शिखर परिषदेमध्ये ब्रिक्सच्या सदस्य देशांनी संयुक्त घोषणापत्र 2026 स्विकारले आहे. या 45 पानांच्या घोषणापत्रात अनेक ठरावांचा समावेश आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न; आता म्हणाले…
  • Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
  • Shweta Mahale : कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा..श्वेता महालेंचं शिंदेंच्या आमदाराला उत्तर
  • Sky Train : अबब…चक्क हवेत उलटी लटकून धावते ट्रेन, लोको पायलटही नसतो; Video व्हायरल
  • मोठी बातमी! भारताचा सर्वात मोठा विजय, भारतात येऊन चीनची पाकिस्तानला मोठी चपराक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in