
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हाय कोर्टात करण्यात आला होता, त्यावर मुंबई हाय कोर्टाकडून कँटीनची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हाय कोर्टाच्या आदेशानुसार चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कँटनची तपासणी करण्यात आली, तपासणीदरम्यान कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत. दरम्यान त्यावर मंत्रालयाच्या उपहारगृहाचे लायसन्स सस्पेंड करा असं हाय कोर्टाने म्हटलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply