• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचं आत्मघाती पाऊल, जगाचा थरकाप, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का,थेट अमेरिकेच्या…

June 6, 2026 by admin Leave a Comment


मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये पूर्ण युद्धविरामावर चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. इराणने मध्य पूर्वेत हाहाकार उडवला आहे. अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणने शनिवारी मोठं आत्मघाती पाऊल उचललं आहे. इराणच्या या निर्णयामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. इराणने थेट बहरीन आणि कुवेतवर मोठा हल्ला केला आहे. बहरीन आणि कुवेत हे अमेरिकेचे सर्वात जवळचे मित्र राष्ट्र आहेत. त्यामुळे आता इराणने बहरीन आणि कुवेतवर हल्ला करून थेट अमेरिकेला इशारा दिल्याचं बोललं जात आहे. इराणने एकामागून एक अनेक मिसाईल बहरीन आणि कुवेतवर डागल्या आहेत. यामुळे आता बहरीन आणि कुवेतनं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेसाठी हा इराणचा मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेकडून काही आखाती देशांना ते आपले मित्र आहेत, असं भासवून त्यांच्या एअरबेसवरून इराणवर हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक हल्ला अमेरिकेनं इराणवर केला होता. आता या हल्ल्याचा बदला इराणने बहरीन आणि कुवेतवर हल्ला करून घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटत होतं की स्ट्रेट ऑफ होर्मुजवर नाकेबंदी केल्यामुळे इराण गुडघे टेकवेल परंतु सध्या तरी याचा उलटा परिणाम होताना दिसत आहे, इराणने माघार न घेता थेट बहरीन आणि कुवेतवर हल्ला केला आहे. इराणने अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला करून अमेरिकेला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

मध्य पूर्वेत पुन्हा तणाव वाढला

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली होती. तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू होतं. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिकन सैन्य तळांवर आणि इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ले केले. दरम्यान त्यानंतर युद्धविराम झाला. परंतु आता इराणने कुवेतवर आणि बहरीनवर हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..
  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in