• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! जगात आणखी एका युद्धाला सुरुवात होणार, इस्त्रायल आता थेट भारताच्या शत्रू देशावर हल्ला करणार? तणाव वाढला

May 1, 2026 by admin Leave a Comment


युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे. त्यामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये तब्बल 39 दिवस युद्ध सुरू होतं. 40 व्या दिवशी इराण अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही अमेरिका आणि इराणमधील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही. इकीकडे अमेरिका, इराणमध्ये निर्माण झालेल्या संघर्षामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे आता इस्त्रायल आणखी एका देशावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. इस्त्रायलकडून तसे संकेत देण्यात आले आहेत. तुर्की हा आता नवा इराण असल्याचं इस्त्रायलने म्हटलं आहे. तुर्कीने सोमालियाशी जवळीक निर्माण केली आहे, त्याबदल्यात तुर्कीने या देशात कच्च्या तेलाचं उत्पादन करण्याची परवानगी मिळवली आहे.

तर दुसरीकडे इस्त्रायलने देखील मोठा डाव खेळला आहे. इस्त्रालयने सोमालियामधून वेगळं झालेलं बेट सोमालीलँन्डला अधिकृत राष्ट्राचा दर्जा दिला आहे. सोमालीलॅन्डला अधिकृत दर्जा देणारं इस्त्रायल हे पहिलं राष्ट्र ठरलं आहे. त्यामुळे तुर्की आणि इस्त्रायलमध्ये तैनाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने आता मोठं पाऊल उचललं आहे. ते म्हणजे सध्या तुर्की आपलं पहिलं स्वदेशी बनावटीचं एअरक्राफ्ट कॅरियर तयार करत आहे. मुगेम असं या एअर क्राफ्ट कॅरिअरचं नाव आहे. हे कॅरिअर प्रचंड मोठं असणार आहे, या एअर क्राफ्ट कॅरिअरचं वजन तब्बल 60,000 टन एवढं आहे, तसेच हे क्राफ्ट 285 मीटर लांब असणार आहे. या एअर क्राफ्टमुळे तुर्कीची समुद्रामधील ताकद आणखी वाढणार आहे.

तर दुसरीकडे इस्त्रायलकडून तुर्कीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जातं आहे, इस्त्रायलचे विरोधी पक्षनेते नेफ्ताली बेनेट जे की इस्त्रायलचे पुढचे पंतप्रधान बनू शकतात, त्यांनी मोठं विधान केलं आहे. तुर्की हा पुढचा इराण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जर सोमालियावरून तणाव आणखी वाढला तर इस्त्रायल तुर्कीवर देखील हल्ला करू शकतो, अशी शक्यता आहे. एका अर्थाने तुर्की हा भारताचा देखील शत्रूच आहे, कारण भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवले होते. तसेच तुर्कीची जम्मू -काश्मीरबाबतची भूमिका ही देखील कायम भारताविरोधीच राहिलेली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू
  • बजाज पल्सर NS400Z नव्या अवतारात, किंमत झाली कमी
  • सर्वाधिक विक्री झालेल्या CNG कारची यादी, अर्ध्या बाजारावर या कंपनीचा कब्जा
  • CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?
  • मोठी बातमी! प्रतिभा चाकणकरांना दणका, खरात प्रकणात ईडीकडून समन्स; सखोल चौकशी होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in