• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार, CJP चं पुढचं आंदोलन आता थेट…, अभिजीत दिपके यांनी फोडला मोठा बॉम्ब

July 26, 2026 by admin Leave a Comment


सरन्यायाधीश तरुणांना कॉकरोच म्हटल्यामुळे अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली, सोशल मीडियातून या पार्टीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यानंतर नीट पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं आणि त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यासाठी अभिजीत दिपके अमेरिकेतून भारतात आले, दिल्लीच्या जंतर मंतरवर त्यांनी आपलं पहिलं आंदोलन केलं. मात्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी तब्बल 1 महिना कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. याच दरम्यान संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यामुळे देशभरात वातावरण आणखी तापलं.

या आंदोलनाला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळाला, विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. दरम्यान दबाव वाढल्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय मानला जात आहे. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पंजाबमधून समोर आलेल्या कथित पेपर लीक प्रकरणावर बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठं विधान केलं आहे. त्यावर आता आमची टीम आंदोलनाची रणनिती तयार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला परंतु पंजाबमधून देखील असंच एक पेपर फुटीचं कथीत प्रकरण समोर आलं आहे, त्यावर देखील दिपके आंदोलन करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता, यावर बोलताना त्यांनी तयारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पंजाब मध्ये आपची सत्ता आहे, त्यामुळे आत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे, आता एक आंदोलन संपलं आहे आम्ही लवकरच रणनीती तयार करत आहोत, लवकरच तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल असं दिपके यांनी म्हटलं आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in