• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! अभिजीत दिपके आंदोलनासाठी पुन्हा जंतर मंतरवर… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम

July 20, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आता पुन्हा आंदोलनासाठी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. त्यांच्यासह शकडो आंदोलकही जंतरमंतर परिसरात दाखल झाले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. राजीनामा दिल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आता या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

जंतर मंतर परिसरात आंदोलकांची गर्दी

जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळाकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. सध्या येथे केवळ पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. परिसरात पोलीस वाहनांचाही मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, आंदोलनस्थळापासून सुमारे 200 मीटर अंतरावर1000 हून अधिक आंदोलक अजूनही रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत. तर अभिजीत दिपके, आशुतोष रांका, सौरव दास आणि आंग्मो हे केरळ हाऊसजवळ धरणे आंदोलन करत आहेत.

आंदोलनातील हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांची उच्चस्तरीय बैठक

आज कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि हिंसाचाराच्या घटनेच्या चौकशीबाबत चर्चा केली. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला असून या घटनांप्रकरणी पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हिंसाचारात 50 हून अधिक पोलीस व निमलष्करी जवान जखमी

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज झालेल्या हिंसाचारात 50 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सुमारे 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलीस आता अनेक गुन्हे दाखल करत असून, विविध ठिकाणांहून हिंसाचारात सहभागी असलेल्या अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या हिंसाचारात सहभागी झालेल्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही आणि इतर व्हिडिओ फुटेजची तपासणी करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समय रैना पुन्हा वादात? प्रसिद्ध कॉमेडियन प्रचंड भडकला, थेट व्हिडीओ पोस्ट करून…
  • भाईजानसोबत काम करण्याचं हिरानींचं स्वप्न ? पण एका गोष्टीमुळे रखडलं दोघांचं काम
  • त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…
  • नेपाळ पुराला जबाबदार असलेला ग्लेशियर कसा काय तुटला ? ग्लोबल वार्मिंग की आणखी काही कारण ?
  • यूपीच्या निवडणुकीमुळे मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर, अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in