• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मेलेलं मढं उकरून काढण्याचा प्रयत्न, दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

September 12, 2026 by admin Leave a Comment


 मनोज लेले, प्रतिनिधी : “मनोज जरांगे पाटील यांचा प्रकृतीचा विचार केला तर त्यांना हे उपोषण झेपणारे नाही. त्यामुळे त्यांनी सरकारच्या नादी लागू नये. सरकारनं मराठा आरक्षणा संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी. उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. सातत्याच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे आणि ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही” असं उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले. “सणामध्ये विघ्न आणण्याचा प्रश्नच येत नाही. सध्या डीजेचा विषय गाजत आहे. नागपूर, पनवेल अशा ठिकाणी डीजे वरती गणेशोत्सवात बंदी घालायची. दुसरीकडे आपलं धोरण स्पष्ट करायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी ते पहिल्यांदा स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे” असं विनायक राऊत डीजे बंदीवर म्हणाले.

दिशा सालीयान प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, हे ‘मेलेलं मढे उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे’. ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावरही विनायक राऊत बोलले. “खरेदी-विक्री करून आपला पक्ष चालवण्याची सवय झालेली आहे. त्यांना स्वतःच्या निर्मिती वरती विश्वास नाही. म्हणून संपत्ती आणि पैशाचा वारे माप वापर करून दुसऱ्याचे प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायचे हा काही जणांचा धंदा झाला आहे. त्याला ही जनता विटली आहे. जनता अशा लोकांना नक्की धडा शिकवेल” असं विनायक राऊत म्हणाले.

इतर पक्षात असं होत नाही

“वरिष्ठ नेतृत्व सध्या पक्ष बांधणीकडे बारकाईने लक्ष देत आहे. गांभीर्याने सर्व गोष्टींचा विचार केला जातोय. इतर पक्षात असं होत नाही. प्रत्येक जिल्हानिहाय आम्ही दौरे लावले आहेत” असं उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना राऊत म्हणाले.

आरक्षणाबद्दल काय मत मांडलं?

“प्रत्येक समाजाला जे जे आरक्षण मिळालेलं आहे, त्या दिलेल्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत हात घालू नये ही आमचीही भूमिका आहे. त्या व्यतिरिक्त जे काही द्यायचं असेल त्याबाबतचा ठोस निर्णय मराठा समाजाकरता सरकारने घ्यावा. ओबीसींचं आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला द्यावं या मताचे आम्हीही नाही आहोत” असं विनायक राऊत यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 80 रुपये किलोचा झेंडू थेट 10 रुपयांवर, ऐन गणेशोत्सवात शेतकऱ्यावर आली फुलं कचऱ्यात फेकण्याची वेळ
  • बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला…
  • वल्लरी विराजनंतर राकेश बापटसोबत झळकणार ही लोकप्रिय अभिनेत्री
  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं, फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक, तोडगा निघणार?
  • मेलेलं मढं उकरून काढण्याचा प्रयत्न, दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in