
पंजाबमधील मतदान यादीच्या मुद्द्यावर राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी आपला पूर्वीचा पक्ष असलेल्या आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. दिल्लीच्या मतदार यादीत आपले नाव कसे समाविष्ट झाले, यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. त्यांनी थेट म्हटले की, हा पक्ष माझ्या एक्स प्रेयसीसारखा वागत आहे. जुन्या गोष्टी विसरणे त्यांना शक्यच होत नाहीत. ते पुढे जातच नाहीत. आपकडून आपल्याबद्दल सातत्याने बोलले जात असल्याचा मुद्द्यावर राघव चड्ढा यांनी हा टोला लगावला. राघव चड्ढा यांनी म्हटले की, माझ्या आणि माझ्या मताबाबत बोलायचे तर आम आदमी पक्ष अशा अवस्थेत पोहोचला आहे की, मी त्यांना रात्री स्वप्नात एखाद्या भूतासारखा दिसू लागलो आहे.
दिवस रात्र ते फक्त राघव चढ्ढा, राघव चढ्ढा, राघव चढ्ढा, राघव चढ्ढा याच गोष्टी करत आहेत. आम आदमी पार्टी ही एखाद्या एक्स प्रेयसीसारखी आहे, जिचा प्रियकर आता पुढे निघून गेला आहे आणि आपलं आयुष्य जगत आहे. तरीही ती मात्र पूर्णपणे त्याच्याच विचारांत मग्न आहे. त्याच्यावर मनापासून प्रेम करत आहे आणि त्याला विसरू शकत नाहीये, असे थेट विधान करत राघव चड्ढा याने मोठा टोला लगावला.
आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली. पुढे राघव चड्ढा यांनी म्हटले की, मला खरोखरच त्यांच्याबद्दल मनापासून काळजी वाटते. मला भीती वाटते की, ब्रेकअप झाल्यानंतर एखाद्या प्रेयसीसारखे विरहात व्याकुळ होऊन कदाचित ते स्वत:च्या हाताची नस कापून घेईल. त्यामुळे मला खरोखर चिंता वाटते.
दिल्लीच्या मतदार यादीत त्याचे नाव ज्या प्रक्रियेद्वारे समाविष्ट करण्यात आले, त्याबाबत स्पष्टीकरण मिळावे अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. त्यानंतरच राघव चढ्ढा यांनी हे विधान केले आणि जोरदार टोला लगावला. आता वाद वाढताना दिसत आहे. भाजपाकडून राघव चड्ढा यांच्यावर मोठी जबाबदारी पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दिली जाणार आहे. त्यापूर्वीच मोठा वाद रंगताना दिसतोय.
Leave a Reply