• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्याकडे चॅटिंगचे पुरावे, अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवचं गुपित फोडलं; खुलासा आल्याने त्या चर्चेला फुलस्टॉप !

September 12, 2026 by admin Leave a Comment


बोल्ड अभिनेत्री खुशी मुखर्जी (Khushi Mukharjee) तिच्या अतरंगी ड्रेसेसमुळे बऱ्याचदा लाइमलाइटमध्ये असते. दरम्यान काही काळापूर्वीच तिने खुलासा केला होता की, क्रिकेटस सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) तिला मेसेज करायचा. क्रिकेटरबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर खुशी बरीच ट्रोल झाली. सूर्यकुमार यादवमुळे माझं इन्स्टा अकाऊंट डिलीट झालं असा आरोप खुशीने लावला. म्हणून मी माझं ॲप सुरू केलं, असंही तिने सांगितलं. यातूनच तिची कमाईदेखील होते. तिथे ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते.

सूर्यकुमार यादवने केले होते मेसेज

बिपिन सिंह यांच्याशी संवाद साधताना खुशी म्हणाली – माझं इन्स्टा अकाऊंट उडालं ( बंद झालं) यामागे सूर्यकुमार यादवच्या टीमचा हात होता का ? मला त्याबद्दल काही कल्पना नाही, पण असं असू शकतं. मी काहीच चुकीचं बोलले नव्हेत, मी खोटं तर बोलले नव्हते ना. तो (सूर्यकुमार यादव) मला मेसेज करायचा. आम्ही मित्रांप्रमाणे गप्पा मारायचो. मी त्याच्या गेमबद्दल त्याच्याशी बोलायचं. आम्ही नॉर्मल बोलायचो. त्यात काहीच आपत्तीजनक नव्हतं. ती गोष्ट एवढी मोठी करण्याची काहीही गरज नव्हती. त्याच्याशी झालेल्या चॅटचे पुरावेमाझ्याकडे अजूनही आहे. मी त्याबाबत काहीही खोटं बोलले नव्हते , असं खुशीने स्पष्ट केलं.

अनेक लोकांनी मला म्हटलं की सूर्यकुमार यादवशी झालेलं चॅट्स आम्हाला दाखव, तरच आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू. जर मला हवं असतं तर मी क्रिकेटर सोबत जे बोलणं झालं ते दाखूव शकले असते, असं खुशी म्हणाली. तेव्हा तो आयपीएलमध्ये खेळायचा, टीम इंडियासाठी खेळत नव्हता. मी कधीच क्रिकेटची चाहती नव्हते, असं खुशीने नमूद केलं. खुशीच्या सांगण्यानुसार, सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त इतर क्रिकेटर्सशी देखील तिचं बोलणं झालं होतं. काही जण तिला गाण गाऊन पाठवायचे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, कदाचित त्या लोकांनाही एकटेपणा जाणवत असेल, याच कारणामुळे त्यांना बोलायची इच्छा असेल. क्रिकेटर्स माझ्याशी बोलतात, पण कोणीही माझ्याशी गैरवर्तन केलं नाही, असंही खुशीने स्पष्ट केलं.

ट्रोलिंगबाबत काय म्हणाली खुशी ? 

या पॉडकास्टमध्ये खुशीच्या मनातील दुःखही व्यक्त झालं. तिने कुटुंबासोबतच्या मतभेदांबद्दलही भाष्य केले. माझ्या भावाला माझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही, असं ती म्हणाली. कुटुंबाने आपला त्याग केला असल्याचंही तिने सांगितले. मी कुटुंबापासून वेगळी राहते. पुढे बोलताना तिने ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली. खुशीने सांगितलं की, मला माझ्या फॅशन चॉईसबद्दल तिला सर्वाधिक ट्रोल केले जाते. मी जे कपडे परिधान करते, ते कायदेशीर आहेत. ट्रोल्सच्या निशाण्यावर असूनही ती आनंदी आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय? मराठा आरक्षण आंदोलनात काय मिळणार?
  • Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच
  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in