• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? आणखी 2 पक्षाचे खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

June 27, 2026 by admin Leave a Comment


उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा त्यांनी केलाय. रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. या कर्जमाफीसाठी रोहित पवार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. राज्य आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘आताच्या घडीला उद्धव ठाकरेंची अडचण नसून एकनाथ शिंदे यांची आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी
भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. त्यात तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंचे खासदार धरलेले आहेत. त्यांना आणखी खासदार फोडायचे आहेत’.

‘भाजपला आकडा पाहिजे. सध्या खासदारांना किंमत आहे. परंतु मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होणार नाही, जर चुकून विधेयक पास झाल्यास सर्व खासदारांची किंमत शून्य होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘एकला चलो रे’ नारा दिला होता. महाराष्ट्रात एका बाजुला एकनाथ शिंदे आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा पक्ष आहे. ‘एकला चलो रे’चा नारा असेल, तर २०२९ च्या निवडणुकीआधी दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील. आता भाजपचे शिंदेंवरील प्रेम हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आहे. महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे. हा सर्व वेळ निघून गेला तर दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांच्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Home Buyers Relief: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बिल्डर अडचणीत
  • Ketan Agrawal Case : सिया गोयलच नाही तर, 115 महिलांवर जोडीदाराच्या हत्येचे आरोप, ‘त्या’ असं करतात तरी का? सायकोलॉजिस्टने सांगितलं डोक्यात काय सुरु असतं..
  • Ketan Agarwal Murder Case : केतनच्या हत्येनंतर सिया आणि चेतनचा ठरला मोठा प्लान , पोलिसांचा दट्ट्या पडताच धक्कादायक गोष्ट समोर; पुढचे…
  • Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याची घोषणा
  • ‘स्क्रिनप्ले किंग’ हरपला! सिनेसृष्टीची 50 वर्षे गाजवणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्याचे निधन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in