• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर! 10 ऑगस्टपासून मोठा बदल

August 5, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतल्या प्रेक्षकांना गेली आठ वर्षे खळखळून हसवणारी, प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग झालेली आणि मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक असलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आठ वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या उंबरठ्यावर पोहोचत आहे. या अविस्मरणीय प्रवासात एक हजारहून अधिक भाग आणि सुमारे तीन हजारहून अधिक भन्नाट स्किट्स सादर करत हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नं प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन केलं नाही तर मराठीतल्या अनेक गुणी कलाकारांना घराघरांत पोहोचवून लोकप्रियता मिळवून दिली. समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, चेतना भट, ओमकार राऊत, प्रभाकर मोरे, वनीता खरात, ओंकार भोजने इत्यादी कलाकारांनी आपल्या अफलातून विनोदी शैलीनं आणि अचूक कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या भन्नाट व्यक्तिरेखांमुळे आणि संस्मरणीय स्किट्समुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज प्रत्येक मराठी घरातील आनंदाचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अविभाज्य भाग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवं, वेगळं आणि अधिक मनोरंजक देण्याची परंपरा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’नं कायम जपली आहे. प्रेक्षकांच्या भरभरून प्रेमामुळे आणि त्यांच्या वाढत्या मागणीमुळे यंदा हास्यजत्रा आणखी एका मोठ्या बदलासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 10 ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीचं फाइव्हजी’ या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आता हा कार्यक्रम आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार, रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नव्या भागासाठी आता प्रेक्षकांना पुढच्या आठवड्याची वाट पाहण्याची गरज नाही. दररोज नव्या भागासह, नव्या स्किट्ससह नवी धमाल आणि खळखळून हसवणारे क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.

‘कॉमेडीचं फाइव्हजी’ ही या पर्वाची केवळ संकल्पना नसून मनोरंजनाचा नवा वेग आहे. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या हास्याचा हा सुपरफास्ट प्रवास आठवड्याचे पाचही दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in