• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ची 8 वर्षे पूर्ण; प्राजक्ता माळीसह इतर कलाकारांकडून आनंद साजरा

August 21, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केला.

महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केला.

गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. विविध व्यक्तिरेखा भन्नाट स्किट्स कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगांना विनोदी अंदाजात मांडण्याची शैली यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने भरभरून प्रेम मिळत आलं आहे.

गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. विविध व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगांना विनोदी अंदाजात मांडण्याची शैली यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने भरभरून प्रेम मिळत आलं आहे.

आठ वर्षांच्या या प्रवासात कार्यक्रमाने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवलं. कार्यक्रमातील पात्र आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे उमटताना दिसतात. सोशल मीडियावर स्किट्सची होणारी चर्चा कलाकारांच्या व्यक्तिरेखांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक नव्या भागाची असलेली उत्सुकता हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या लोकप्रियतेचं दर्शन घडवतं.

आठ वर्षांच्या या प्रवासात कार्यक्रमाने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवलं. कार्यक्रमातील पात्र आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे उमटताना दिसतात. सोशल मीडियावर स्किट्सची होणारी चर्चा, कलाकारांच्या व्यक्तिरेखांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक नव्या भागाची असलेली उत्सुकता हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या लोकप्रियतेचं दर्शन घडवतं.

या खास प्रसंगी कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले महाराष्ट्राची हास्यजत्राचा आठ वर्षांचा प्रवास आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या प्रवासात कलाकार लेखक तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आपलंसं केलं. आमच्या पात्रांवर विनोदावर आणि कलाकारांवर त्यांनी जे प्रेम केलं तेच आम्हाला सातत्याने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत आलं आहे. आठ वर्षांनंतरही प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची हीच ऊर्जा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे.

या खास प्रसंगी कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले, “महाराष्ट्राची हास्यजत्राचा आठ वर्षांचा प्रवास आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या प्रवासात कलाकार, लेखक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आपलंसं केलं. आमच्या पात्रांवर, विनोदावर आणि कलाकारांवर त्यांनी जे प्रेम केलं, तेच आम्हाला सातत्याने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत आलं आहे. आठ वर्षांनंतरही प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची हीच ऊर्जा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हा आठ वर्षांचा प्रवास म्हणजे कलाकार तंत्रज्ञ लेखक निर्माते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीसोबतच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा उत्सव आहे. सेटवर झालेल्या या छोटेखानी सेलिब्रेशनमधूनही संपूर्ण टीमचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा आणि या कार्यक्रमाविषयीची आपुलकी पाहायला मिळाली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हा आठ वर्षांचा प्रवास म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, निर्माते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीसोबतच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा उत्सव आहे. सेटवर झालेल्या या छोटेखानी सेलिब्रेशनमधूनही संपूर्ण टीमचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा आणि या कार्यक्रमाविषयीची आपुलकी पाहायला मिळाली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in