• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला डॉक्टर व्हायचं होतं पण…, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या धनुभाऊ भाग्यवान कारण…

May 3, 2026 by admin Leave a Comment


राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात अनेकदा माणसाची मूळ स्वप्ने मागे राहतात. असाच काहीसा अनुभव भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मला डॉक्टर होऊन रुग्णसेवा करायची होती, पण मार्कांअभावी ते स्वप्न अपूर्ण राहिले अशी कबुली पंकजा मुंडे यांनी दिली. परळीतील पार्थ सोलार प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थितीत होते.

पार्थ सोलार प्लांटच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील काही किस्से सांगत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माणूस ठरवतो एक आणि होतं दुसरंच. मला मनापासून वैद्यकीय क्षेत्रात जायचं होतं, डॉक्टर होऊन सेवा करायची होती. पण बारावीला मार्क कमी पडले आणि वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग बंद झाला. त्यामुळे माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या करिअरबद्दलचीही माहिती दिली.

धनु भाऊ मात्र भाग्यवान…

डॉ. प्रीतम मुंडे यांना खरंतर कायद्याचा अभ्यास करून वकील व्हायचे होते, मात्र नशिबाने त्या डॉक्टर झाल्या. माझी धाकटी बहिण यशश्री मुंडे यांनी मात्र वकिलीचे शिक्षण पूर्ण करत ती पदवी मिळवली. धनु भाऊ मात्र भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले, असंच होतं ज्याला जे व्हायचं असतं ते होता येत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

आज ‘पार्थ सोलार’च्या २.५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले.

​डॉ. बालासाहेब कराड आणि शालिनीताई कराड यांच्या पुढाकारातून साकारलेला हा प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.

हा प्रकल्प शहराच्या प्रगतीत… pic.twitter.com/UrZGjJvVPo

— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 2, 2026

व्यवसायावरून मिश्किल टोलेबाजी

यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या उद्योगाबद्दलही मोठे विधान केले. माझा आणि माझ्या व्यवसायाचा तसा दूरवर संबंध नाही. मी एक मोठी डिस्टिलरी चालवते, पण तिथला कारभार कसा चालतो किंवा तिथला ब्रँड कोणता आहे, याची मला साधी माहितीही नसते, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे बहीण-भावामधील कौटुंबिक जिव्हाळा आणि राजकारणापलीकडची मैत्री पुन्हा एकदा जनतेला पाहायला मिळाली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in