• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारेंची उडी; मनोज जरांगे यांना दिला महत्त्वाचा सल्ला

September 10, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. जरांगे यांनी गेल्या 13 दिवसांपासून उपोषण करत मराठा-कुणबी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टरांकडून उपचार नाकारले होते. परंतु सरकारच्या प्रतिनिधीच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास सुरूवात केली. त्यांनी डॉक्टरांकडून सलाइन लावून घेतली. तेरा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे यांच्या वजनातही घट झाली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांचा अनुभव देखील सांगितला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. डॉ. गौतम भन्साळी यांच्या देखरेखीखाली अण्णा हजारे यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आज गुरुवारी अण्णा हजारे यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी हजारे यांनी मनोज जरांगे यांना महत्वाचा सल्ला दिला.

अण्णा हजारे यांनी म्हटलं की, माझी तब्बेत एकदम ठणठणीत आहे. डॉक्टरांनी चांगले उपचार केले’. अण्णा हजारे यांनी मराठा आरक्षणावर म्हटलं की, मी आयुष्यात २२ उपोषण केले. उपोषणामुळे तब्बेत ठणठणीत राहते. उपोषण हे समाजासाठी, देशासाठी असले पाहिजे. आयुष्यभरात मी उपोषणे करून १० कायदे मंजूर करून घेतले’.

अमृत फडणवीसांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाऊ असं संबोधले. अमृता फडणवीसांच्या विधानाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना घरी जेवायला यावे, अशी इच्छा अमृता फडणवीस यांनी नागपुरातून व्यक्त केली होती.त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सोडीचोळी घेऊन अमृताताईंना भेटणार असल्याचे जरांगेंनी सांगितले. त्याचबरोबर संकटाच्या काळात बहिणीने बावाला पाठिंबा द्यावा, असे जरांगे यांनी म्हटलं .



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • असं एक गाव जिथे लोक झोपतच नाही, रात्रभर वाजवतात थाळ्या, अंधार होताच लाठ्या… असं काय घडतं या गावात?
  • भाजपची ताकद वाढली, कोकणात रविंद्र चव्हाणांनी मोठा डाव टाकला, काय आहे नवीन समीकरण?
  • Ishan Kishan Record: इशान किशनने मोडला 16 वर्षे जुना विक्रम, आता अव्वल स्थानी विराजमान
  • भारताची नवीन औद्योगिक क्रांती जोमात, अवकाश, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेटा सेंटर खाजगी क्षेत्रासाठी खुले…
  • 55 वर्षांपूर्वी या व्यक्तीला पाहण्यासाठी मुलं बघायची रविवारची वाट, इतकी क्रेझ की आता OTT पाहण्यासाठी गर्दी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in