• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मराठावड्यात झाला पक्षफुटीचा प्लॅन अन्… ठाकरे गटातील नेत्याचा खळबळजनक दावा

June 18, 2026 by admin Leave a Comment


ऑपरेशन टायगरवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. बंडखोर खासदारांना 50 कोटी रुपये, मंत्रिपद तसेच पक्ष फुटीसाठी 15 कोटींची आगाऊ रक्कम देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही मोठा आरोप करत खळबळ उडवून दिली. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी मराठवाड्यातील एका कॉन्ट्रॅक्टरवर तब्बल 600 कोटी रुपयांची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सध्या हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नसल्याचेही खैरे म्हणाले.

गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असा इशारा देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. संबंधित 6 खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in