• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर CM फडणवीसांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले? वाचा

August 30, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज रविवारी दुसरा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील कार्यक्रमाला दर्शवला आहे. अंतरवाली सराटीतून आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मागणीवर मार्ग काढणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मला असं वाटतं की जे काही आंदोलन चालले आहे. त्या आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. ते चर्चा करणार आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. पुढेही आपण मार्ग काढणार आहोत. उपमुख्यमंत्री शिंदे हे सुरवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत’. जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’ ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्या नसतील, अशा सगळ्या मागण्यांकरिता आम्ही चर्चेची दारे खुली ठेवली आहेत’.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाची पाहणी केल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘गोरेवाडा प्राणी उद्यान तयार केलं. शहरापासून सहा किलो मीटर अंतरावर आहे. मागील 25 वर्षांपासून प्राणी उद्यान तयार करण्याठी प्रयत्न करत होतो. रेस्क्यू सेंटर सुरू केलं. त्यानंतर इंडियन सफारीची सुरुवात केली. पुढच्या वर्षी आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यात देशातील सर्वात चांगलं रेस्क्यू सेंटर झालं आहे. जेवढे डॉक्टर आहेत. जे महत्त्वाचे प्राणी आहेत, त्यांना त्यांच्यावर शिकण्यासाठी संधी मिळत नाही. ती संधी येथे मिळेल. मोठ्या प्रमाणात डॉक्टर येत आहेत. इतर काही स्टाफ येताहेत. त्यांचंही ट्रेनिंग होईल’.

तर आफ्रिकन सफारी आकर्षणांचं केंद्र ठरेल – फडणवीस 

‘देशभरात येथून प्राणी चालले आहेत. मी फेरफटका मारला. बिबट्या, वाघ असे सर्व प्राणी पाहायला मिळाले. याचा पुढचा टप्पा कसा करायचा, याबाबत माझी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठक आहे. इकडे चांगलं हॉटेल व्हावं, अशीही पुढची कार्यवाही आहे. आफ्रिकन सफारी आकर्षणांचं केंद्र ठरेल. बीग फाईव्ह या सफारीच्या माध्यमातून येतील. जगभरात ज्यांना पाहण्यासाठी जातात, ते येथे उपलब्ध होतील. शाळेचे मुलं येत आहेत. विदर्भासह मध्य प्रदेशातूनही विद्यार्थी येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्याबाहेर जोरदार घोषणाबाजी, गोंधळ झाल्याने… नेमकं काय घडलं?
  • Tata च्या कार खरेदीची मोठी संधी, Curvv ते Harrier EV पर्यंत मिळतोय 3.35 लाखांपर्यंत डिस्काउंट
  • Vaibhav Sooryavanshi: नाद करतो काय! कॅप्टन्सी मिळताच वैभवचा मैदानात धुरळा, थेट अंपायरला खोटं ठरवलं, Video Viral
  • या खास तारखांना जन्मलेले लोकं असतात जिद्दी, कोणत्याही परिस्थितीत मिळवतात यश
  • टॉवेल वापताना कोणती काळजी घ्याल, किती वेळा स्वच्छ पाण्यात धुवाल…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in