• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भूषण प्रधानची होणारी बायको कोण? गुपचूप उरकला साखरपुडा, लग्नाची पत्रिका शेअर करत म्हणाला…

April 14, 2026 by admin Leave a Comment


Bhushan Pradhan Marriage Date : गेल्या काही महिन्यांपासून फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, मराठी सिनेविश्वात देखील लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक सेलिब्रिटींनंतर आता मराठी सिनेविश्वातील सर्वात हँडसम अभिनेता भूषण प्रधान देखील नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. ही आनंदाची बातमी खुद्द अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर भूषण याने पोस्ट केलेल्या एका फोटोची चर्चा रंगत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लग्नाची तारीख देखील घोषित केली आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं देखील कळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भूषण याच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे.

भूषण याने होणाऱ्या बायकोसोबत फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोघे अंगठी दाखवताना दिसत आहेत. यावरून त्यांचा साखरपुडा झाल्याचं स्पष्ट होतं. पण अभिनेत्याने होणाऱ्या बायकोचा चेहरा लपलेला आहे. त्यामुळे लाखो तरुणींचा क्रश असणाऱ्या भूषण याची होणारी बायको कोण आहे… याबद्दल काही कळू शकलेलं नाही… फोटो पोस्ट करत अभिनेत्याने लग्नाची तारीख देखील जाहिर केली आहे. 24 जुलै 2026 रोजी भूषण याचं लग्न होणार आहे… फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan)

 

फोटोमध्ये भूषणच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दिसत नसल्यामुळे, ती कोण आहे आणि कशी दिसते… हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सांगायचं झालं तर, भूषण याआधी देखील अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेला. एवढंच नाहीतर, जुनं फर्निचर फेम अभिनेत्री अनुशा दांडेकरसोबत देखील अभिनेत्याच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. त्यामुळे भूषण याची बायको नक्की कोण आहे, हे अद्यप कळू शकलेलं नाही. त्यामुळे चाहते देखील अभिनेत्याच्या पुढच्या पोस्टच्या प्रतिक्षेत आहेत.

भूषण याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘घरात गणपती’, ‘लग्न कळ्ळोळ’, ‘जुनं फर्निचर’, ‘ऊन सावली’, ‘तू तिथे असावे’, ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही…’ अशा अनेक सिनेमांमध्ये भूषण याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील भूषण कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon 2026: चिंब भिजायला तयार राहा, पाऊस लवकरच वस्तीला, केरळमध्ये मान्सून कधी धडकणार? El Nino पाणी फेरणार?
  • शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
  • Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
  • Sanjay Raut | सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा मोठा इशारा, थेट निर्बंधच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in