• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताला ज्याची भीती तेच घडले! आता काही खरे नाही, अमेरिकेने दाखवला रंग, थेट 100 टक्के टॅरिफचे..

July 29, 2026 by admin Leave a Comment


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, हे सांगता येत नाही. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प भारताकडे वाकड्या नजरेने बघताना दिसत आहेत. टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात राहिले आहेत. त्यामध्येच आता भारतावर पुन्हा एकदा मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लादला जात आहे. ज्यामुळे भारताच्या चिंतेत मोठी वाढ झाली. एक महत्वाचे बिल अमेरिकेच्या संसदेत आहे, पास झाले. भारतावर 100 टक्क्यांपेक्षा अधिक टॅरिफ लागू शकतो. सीनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे तयार केले होते. हे बिल रशिया आणि युक्रेन युद्धाकरिता आहे. रशियावर दबाव आणण्यासाठी हे बिल आणण्यात आले. यामुळे रशियावरील आर्थिक दबाव वाढेल. रशियाकडून तेल खरेदी भारत आणि चीन सर्वाधिक करतो.

या बिलाचा स्पष्ट अर्थ आहे की, भारत, चीन, हंगरी, स्कोवाकिया आणि अजरबॅजान यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावणे. या बिलाला हिरवा झेंडा मिळाल्याचे कळतंय. फक्त 100 टक्के टॅरिफचे नाही तर अनेक मोठे निर्बंध देखील लादले जाऊ शकतात. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणारा मोठा देश आहे. रशिया भारताला मोठी सवलत देतो. भारत 40 टक्के तेल रशियाकडून आयात करतो.

काही दिवसांपूर्वीच भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 200 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला होता. आता पुन्हा टॅरिफचे शस्त्र अमेरिकेने काढल्याचे बघायला मिळतंय. ज्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात येऊ शकतात. नुकताच भारतावर 10 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. या 10 नंतर आता 100 टक्के टॅरिफचे मोठे संकत भारतापुढे उभे आहे.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात होती. यादरम्यान भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केला. इतका मोठा टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावूनही भारतावर कोणताही परिणाम यादरम्यान झाला नाही. भारताने मार्ग काढली. आता पुन्हा एकदा भारतावर टॅरिफचे मोठे संकट आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर दबाव टाकला जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद
  • साखर कारखान्याबाहेर सभासदांची झुंबड, स्मार्ट बाजारामध्ये साखरेबाबत मोठा निर्णय, 1 व्यक्तीला एकच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in