• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताला ज्याची भीती तेच घडतंय, तुर्की, पाकिस्तानसह इस्लामिक राष्ट्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत..

August 13, 2026 by admin Leave a Comment


7 ऑगस्ट रोजी तीन मुस्लिम देशांनी संरक्षण करार केला. या कराराला नाव मक्का संयुक्त रक्षा करार देण्यात आले. नाटो देशांप्रमाणे त्यांनी हा करार केला. या करारानुसार, तीनपैकी एका देशावर जरी हल्ला झाला तर तो तीन देशांवर मानला जाणार असल्याचे स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो फक्त पाकिस्तानच नाही तर थेट तुर्की आणि साैदी अरेबिया यांच्यावरही समजला जाईल. हेच नाही तर तुर्कीचे संरक्षण मंत्री यांनी आता भारतासह जगाचे टेन्शन वाढवले. त्यांनी म्हटले की, या कराराचा विस्तार होऊ शकतो. हा करार सरळ सरळ भारताला केंद्रित करून तयार करण्यात आला नाही, असे सांगितले जातंय. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध बघता भारतासाठी डोक्याला ताण वाढवणारा हा करार आहे. मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. पाकिस्तानी सैन्याला भारताने सळो की पळो करून सोडले होते.

अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, अन्नधान्याची कमी, बेरोजगारी आणि इतर देशांकडून घेतलेले कर्ज यामुळे पाकिस्तानला चांगल्या पद्धतीने समजले की, ते भारतासोबत युद्ध कधीच करू शकत नाहीत. ज्यमुळे त्यांनी भारतासमोर असा डाव टाकला, ज्यामुळे भारत त्यांच्यावर हल्ला करताना चारवेळा विचार करेल.

जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो तुर्की आणि साैदी अरेबियावर केल्याचेही समजले जाईल. पाकिस्तान 80 टक्के शस्त्र पाकिस्तानकडून खरेदी करतो. भारताचे खाडी देशांसोबत संबंध अधिक वाढली आहेत. त्याकरिताच हा करार त्यांच्याकडून करण्यात आला. हा करार म्हणजे कुठे ना कुठे भारतासाठी तणाव नक्कीच आहे.

तुर्की आणि भारताचे संंबंध गेल्या काही दिवसांपासून तशी तणावात आहेत. त्यातच तुर्कीने पाकिस्तानसोबत संरक्षण करार केला. भारतही इस्त्रायलसोबत संरक्षण करार करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, असा कोणताही करार भारत करत नाही किंवा याबाबतची कोणतीही चर्चा भारत आणि इस्त्रायलमध्ये झाली नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर
  • J-10CE : भारताच्या जिगरी मुस्लिम मित्राला चीनने दिली फायटर जेट्स, पण या डीलमुळे पाकिस्तान फुल टेन्शनमध्ये, त्यांना मनात एकच भिती
  • BSNL ग्राहकांना मोठा झटका! स्वस्त प्लॅनची वैधता झाली कमी, जाणून घ्या काय बदलले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in