• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा पाकिस्तानात संशयास्पद मृत्यू, मुंबईवरील 26/11 हल्ल्यात होता सक्रीय सहभाग…

August 10, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे लष्कर -ए- तैयबाचा एका सिनिअर कमांडर कारी सईद अब्दुल अझीज याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूच्या वेळी कारी सईद अब्दुल अझीज एका मशिदीजवळ होता. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या सामील असलेल्या सईद अब्दुल याचा ८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानची राजधानीत एका मशिदीच्या गेटजवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. या मशिदीत पोहचण्याआधी सईद अब्दुल याने अनोळखी ठिकाणी जेवण घेतले होते. मस्जिदच्या गेटवर पोहचताच अचानक तो कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.

सईद अब्दुल याच्या मृत्यू मागील खरे कारण अजूनही कळालेले नाही. स्थानिक प्रशासनाने सईद अब्दुल याच्यावर विषप्रयोग झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे.

LeT चा महत्वाचा सदस्य होता सईद अब्दुल !

कारी सईद अब्दुल अजीझ, अतिरेकी संघटना लष्कर – ए-तैयबाच्या महत्वाच्या सदस्यापैकी एक होता. त्याने 26/11 मुंबईवरील हल्ल्यासह अनेक अतिरेकी हल्ल्यांची योजना तयार करण्यात मुख्य भूमिका निभावली होती.

संघटनेच्या आत तो एक खास डिव्हीजन सांभाळत होता. ही डिव्हीजन जम्मू-कश्मीरात सुरक्षा दलासोबत चकमकीत मारले गेलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था करणे आणि त्यांच्याशी सतत संपर्क राखण्याचे काम करत होता. त्याच्या अचानक मृत्यूने क्षेत्रीय गुप्त संघटनाचे लक्ष वेधले आहे.

आतापर्यंत ३० हून अधिक लष्करी अतिरेकी ठार

अलिकडेच पाकिस्तानातील अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैयबाने स्वत: कबुली दिली होती की अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानात लष्कराचे सुमारे ३० अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित अतिरेकी रिजवान हनीफ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडीओत दावा केला होता की गेल्या तीन ते चार वर्षात पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरात वेगवेगळ्या भागात आमच्या संघटनेचे अनेक लोक मारले गेले आहेत. पेशावर, कराची, रावळपिंडी,रावलाकोट आणि मुझफ्फराबादमध्ये लष्कर-ए-तैयबाचे ३० हून अधिक सदस्य अज्ञात हल्लेखोरांच्या हाती मारले गेले आहेत.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in