
रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्वादिमीर पुतिन हे भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग नोंदवल्यानंतर पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करण्याची शक्यता आहे. या बैठकीत संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या द्विपक्षीय बैठकीत महत्त्वाचा करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
S-400 क्षेपणास्त्र सिस्टीम, ब्रह्मोस-एनजी क्षेपणास्त्र अपग्रेड , Su-30 एमकेआय फायटर जेट अपग्रेड, 5th जनरेशन Su-57E लढाऊ विमान या चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताने 2018 मध्ये रशियात पाच S-400 क्षेपणास्त्र सिस्टिम खरेदी करण्यासाठी 5.43 अब्ज डॉलरचा करार झाला होता. यातील 4 क्षेपणास्त्र सिस्टिम आधीच आले आहेत. तर पाचवा क्षेपणास्त्र सिस्टिम नोव्हेंबर 2026 पर्यंत येण्याची शक्यता आहे. आता मोदी-पुतिन यांच्यामध्ये या पाचव्या क्षेपणास्त्राबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच रशियाने भारताला देखभाल, दुरुस्ती आणि तपासणीसाठी सुविधा उभारण्याचा प्रस्ताव दिलाय.
भारत आणखी पाच एस-400 क्षेपणास्त्र सिस्टिम सक्वॉड्रन खरेदी करण्याचा विचार करत आहे. यासाठी रशियाने 50000 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. अतिरिक्त सिस्टिमच्या खरेदीमुळे हवाई संरक्षण क्षमता दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. S-400 क्षेपणास्त्र सिस्टिममध्ये विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनला लक्ष्य करण्याची क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये याचा वापर करण्यात आला होता. अतिरिक्त खरेदी केल्याने भारताची संरक्षण सिस्टिम आणखी मजबूत होईल.
ब्रह्मोस भारत-रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. जगातील वेगवान सुपसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. दोन्ही देश आता ब्रह्मोस-एनजीवर काम करत आहे. या क्षेपणास्त्राचं वजन 1.3 टन इतकं आहे. तसेच याची हल्ला करण्याची क्षमता 400 किलोमीटरहून अधिक आहे. भारतीय हवाई दलाकडे 260 Su-30MKI लढाऊ विमान आहे. या विमानाला सुपर सुखोई कॉन्फिगरेशनमध्ये अपग्रेड करण्याचावर चर्चा सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च हा 11 अब्ज डॉलरहून अधिक आहे. या प्रकल्पामुळे जुन्या विमानांचं आयुर्मान वाढणार आहे. त्याचबरोबर भारत स्वदेशी क्षमता वाढवण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
Su-57 रशियाचं 5th जनरेशनचं स्टेल्थ लढाऊ विमान आहे. भारतात गेल्या अनेक वर्षांपासून विमानाच्या अॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टवर काम केली जात आहे. हे विमान प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक वर्षे जातील. चीन आणि पाकिस्तानची वाढती स्टेल्थ क्षमता पाहता भारतालाही याची गरज आहे. रशियाने भारताला Su- 57E विक्री करणे, भारतात संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचाही प्रस्ताव दिला आहे.
Leave a Reply