• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बालभारतीच्या सहावीच्या पुस्तकावरुन वाद ! वर्ण व्यवस्था आणि मांसाहाराचा उल्लेख वगळला ?

June 28, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) इयत्ता सहावीच्या नवीन पुस्तकात इतिहास तसेच नागरिकशास्रचे पाठ्य पुस्तक चर्चेत आले आहे. नव्या पुस्तकात वैदिक काळ, जात व्यवस्था, सामाजिक असमानता आणि खानपानाशी जोडलेल्या अनेक भागात बदल केले आहेत. काही जुने अंश हटवले आहेत. तर नवीन धडे आणि विवरण जोडले गेले आहे. या बदलानंतर इतिहासाच्या सादरीकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. या बदलाच्या बाजूने बोलणारे लोक मुलांना सरळ आणि वयानुरुप बदल म्हणत आहेत. चला तर पाहूयात पुस्तकात नेमका काय बदल केला आहे हे पाहूयात…

बालभारतीने प्रकाशित केलेल्या इयत्ता सहावीच्या पुस्तकात नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल केला आहे. गेल्या वर्षी पहिल्या इयत्तेला नवीन पुस्तके लागू केली होती. या वर्षी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहाव्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात बदल केला आहे. इतिहास आणि नागरीकशास्राच्या नव्या पुस्तकाचा मूळ ढाचा आधी सारखाच ठेवला आहे. परंतू अनेक धडे नव्याने लिहिले आहेत. खासकरुन वैदिक काळ, समाज व्यवस्थेबद्दल इतिहास आणि नागरिकशास्राच्या नवीन पुस्तकात अनेक सुधारणा केल्या आहेत. पुस्तकात आता घडामोडी, चित्रे, अतिरिक्त माहिती आणि स्थानिक संदर्भाची अधिक माहिती दिली गेली आहे.

जाती व्यवस्थेचा उल्लेखात बदल का ?

जुन्या पुस्तकात आधी लिहिले होते की वैदिक काळात वर्ण व्यवस्था व्यवसाय आधारित होती, परंतूनंतर जन्माआधारे निश्चित होऊ लागली. ज्यामुळे जाती व्यवस्था आणि सामाजिक असमानता निर्माण झाली. नव्या पुस्तकात मात्र हे विस्तृत वर्णन हटवून केवळ समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र चार वर्ण व्यवस्था होती असा बदल केला आहे. जाती व्यवस्था आणि त्याच्या सामाजिक प्रभावांचा थेट उल्लेख केलेला नाही. हा बदल मुलांच्या वयाच्या अनुरुप आणि अभ्यास सोपा करण्याचे उद्देश्याने केल्याचे इतिहास समितीने म्हटले आहे.

बौद्ध आणि जैन धर्माबद्दल काय लिहिलंय ?

जुन्या पुस्तकात म्हटले होते की वैदिक काळाच्या अंतिम भागात यज्ञाची काठिण्य, ज्ञानावर मर्यादित वर्गाचे नियंत्रण आणि वर्ण व्यवस्थेची जाचकतेमुळे जुन्या पुस्तकात नव्या धार्मिक विचारांचा विकास झाला. ज्यामुळे बौद्ध आणि जैन धर्मांचा उदय झाला. मात्र, नव्या पुस्तकात हे विस्तृत कारण हटविली आहे. मात्र भगवान महावीर आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीचा उल्लेख आताही आहे, मात्र, त्यात वर्ण आधारित भेदभावाचा विरोध आणि चांगले आचरणाला श्रेष्ठतेचा आधार म्हटले आहे.

वैदिक काळाचे नवे चित्रण कसे ?

नवीन पुस्तकात वैदिक काळाला अधिक सकारात्मक रित्या सादर केले आहे. यात सत्य, सहयोग, शिस्त, आत्मसंयम,उदारता आणि परस्परांचा सन्मान ही त्या काळातील प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली आहेत. शिक्षणाचा उद्देश्य केवळ ज्ञान नव्हे तर नैतिक मूल्यांचा विकास म्हटले आहे. तसेच योग, संतुलित जीवनशैली आणि आरोग्याचे महत्व याचा उल्लेखही केला आहे. वैदिक समाजात सहकार्य आणि सामुदायिक भावना प्रमुख होती असे म्हटले आहे.

स्त्रियांबद्दल काय लिहिलेय?

नवीन पुस्तकात सुरुवातीला वैदिक समाजातील स्त्रियांची स्थिती तुलनेने चांगली असल्याचे लिहिलेले आहे. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा, वेदांचा अभ्यास करण्याचा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याचा हक्क होता. त्यात गार्गी, मैत्रेयी, घोषा, लोपामुद्रा आणि अपाला यांसारख्या विद्वान स्त्रियांची उदाहरणेही दिली आहेत. मात्र, उत्तर वैदिक काळात स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि शिक्षण घेण्यावर निर्बंध आले आणि समाज अधिक पितृसत्ताक बनल्याचे लिहिले आहे.

मांसाहाराचा उल्लेख वगळला

नवीन पुस्तकात वैदिक समाजाच्या आहारात बार्ली, गहू, तांदूळ, बाजरी, फळे, भाज्या, दूध, दही आणि मध यांचा उल्लेख केला आहे. हा आहार संतुलित आणि सात्विक असल्याचे लिहिले आहे. मात्र, जुन्या पुस्तकात वैदिक काळातही मांसाहार होत असल्याचा उल्लेख होता. मात्र, या नव्या पुस्तकात हडप्पा संस्कृतीच्या आहारातील मांसाचा उल्लेख कायम ठेवला आहे. मांसाहाराचा उल्लेख हेतुपुरस्सर वगळण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नसल्याचे इतिहास समितीच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

आरक्षण विभागात कोणते बदल ?

नागरिकशास्त्र प्रकरणातही बदल केले आहेत. जुन्या पाठ्यपुस्तकात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आणि वंचित गटांना आरक्षण देण्यामागील सामाजिक न्यायाच्या भूमिकेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. नवीन पाठ्यपुस्तकात आरक्षणाचा उल्लेख असला तरी त्यामागील भूमिका मांडलेली नाही.मात्र, भारतीय संविधान, संविधान सभा आणि प्रस्तावना यांवर दोन नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत.

बालभारतीने काय स्पष्टीकरण दिले?

हे पुस्तक मुलांचे वय, शिकण्याची काठीण्य पातळी आणि नवीन शिक्षण धोरणाची उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे बालभारतीच्या इतिहास समितीच्या अध्यक्षा शुभांगणा अत्रे यांनी सांगितले. त्यांच्या मते, इतिहास सोप्या, सर्जनशील पद्धतीने मांडणे आणि त्याला समकालीन संदर्भांशी जोडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. ऐतिहासिक तथ्ये लपवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत राज्यभरातील शिक्षक आणि तज्ज्ञांचा सहभाग असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs IRE: टीम इंडियावर मालिका 2-0 ने गमवण्याची वेळ, 8 षटकांचा खेळ झाला आणि पावसाची हजेरी
  • करोडोचे आमिष, पण फुटले नाहीत, आज जाहीर सभेत शब्दच दिला, राजाभाऊ वाजेंच्या त्या शब्दांनी शिवसैनिकही भारावला
  • Vastu Shastra : हातात पैसाच टिकत नाही, मग शुक्रवारी घरी आणा ही खास वनस्पती, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर
  • धो धो धो…धरणं भरणार, नद्यांना पूर, कुफान पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!
  • ENG vs NZ: बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना सुरू असताना घेतली निवृत्ती, म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in