• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बहिणीचा सांगाडा भावाने कबरीतून थेट बँकेत नेला… पुढे जे घडलं, ते अत्यंत धक्कादायक

April 28, 2026 by admin Leave a Comment


भाऊ – बहिणीची नातं फार पवित्र मानलं जातं. बहीण संकटात असते, तेव्हा भाऊ धावत येतो. पण याठिकाणी असं काही झालं आहे. ज्यामुळे तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल, भावाने मृत बहिणीचा सांगाडा कबरीतून थेट बँकेत नेला.. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, भावाने असं का केलं असेल. तर जाणून घ्या ही धक्कादायक घटना कुठे आणि का घडली?  ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी ऐकून माणूस हादरून जाईल. एका भावाने आपल्या मृत बहिणीचा सांगाडा कबरीतून काढून थेट बँकेत घेऊन गेला. यामागचं कारण थक्क करणारं आहे. भऊ बँकेकडे सतत विनंत्या करत होता, पण बँक कर्मचाऱ्यांनी त्याच्या विनंत्यांकडे वारंवार केलेलं दुर्लक्ष.

मिळालेल्या माहितीनुसार, दियानाली गावचा रहिवासी जीतू मुंडा याने आपल्या दिवंगत बहिणीचे अवशेष बँकेसमोर आणून ठेवले. त्याच्या बहिणीचं नाव कलारा मुंडा असं होतं. जीतू मुंडा अनेकदादा बँकेत जाऊन अधिकाऱ्यांकडे विनंती करत होता की बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी द्यावी. बहिणीच्या मृत्यूची माहितीही त्याने बँकेला दिली होती, तरीही अधिकाऱ्यांनी दर वेळी सांगितलं की खातेदाराने स्वतः उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचे अर्ज धुडकावले जात राहिले.

शेवटी हताश झालेल्या जीतूने एक धक्कादायक पाऊल उचललं. साधारण दोन महिन्यांपूर्वी पुरलेल्या बहिणीची कबर त्याने खोदली, सांगाडा बाहेर काढला आणि थेट बँकेसमोर आणून ठेवला. या कृत्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासन दोन्ही खडबडून जागे झाले.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पटना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती शांत करण्यात आली आणि कलाराचे अवशेष पुन्हा दियानाली गावात नेऊन दफन केले गेले. मात्र आजपर्यंत बँक अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

या घटनेमुळे परिसरात संताप उसळला आहे. एका गरीब माणसाला न्याय मिळवण्यासाठी असं टोक गाठावं लागलं, यावरून बँक कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेबद्दल आणि कार्यपद्धतीबद्दल लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाजपच्या एका बड्या नेत्याने खाल्ला शाकाहारी मासा? नेमकं सत्य काय?
  • पाकिस्तानला घाम फोडणारी बातमी! रशियाने भारताला दिली गुड न्यूज, लवकरच S-400…
  • पचनशक्ती वाढवण्यासाठी ‘ही’ फळे ठरतील वरदान, आतड्यांचे आरोग्य सुधारेल
  • हा चित्रपट पाहून थिएटरमध्ये रडायचे प्रेक्षक, 25 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, केलेली बजेटच्या दुप्पट कमाई
  • अजित पवारांच्या अपघातातील विमानाचा CDR अमेरिकेच्या… रोहित पवारांचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in