• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बदनामी काय असते हे कळायला..; शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांना शिकवला असा धडा

June 4, 2026 by admin Leave a Comment


‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे नुकत्याच तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. शिल्पाने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडत निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्यावेळी केलेले हे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने आता दहा वर्षांनंतर केला आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर मी लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केल्याची कबुली शिल्पाने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये दिली होती. यावरून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिल्पाने पैशांसाठी खोटे आरोप केल्याचं काही नेटकरी म्हणत असून तिला प्रचंड ट्रोलसुद्धा केलं जात आहे.

या संपूर्ण प्रकरणावर शिल्पा पुन्हा एकदा ‘झूम/ टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली. “त्यावेळी मला खूप त्रास दिला जात होता. आज मी जर एखाद्या गोष्टीवर ठाम असेल, तर ते केवळ माझ्या प्रामाणिकपणामुळेच आहे. त्यावेळी माझ्यावर कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला होता. एकीकडे मालिका सुरू होती, दुसरीकडे मला काम करण्यापासून थांबवण्यात आलं होतं. मी यापुढे सेटवर येऊ नये, असं थेट मला सांगितलं गेलं. संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री माझ्याविरोधात गेल्याने मी पूर्णपणे एकटी पडली होती. मला बसून खायला-प्यायला देणारं कोणीच नव्हतं. म्हणून मी लढायला घाबरले नव्हते. जेव्हा एखाद्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यक्तीवर कोणत्याही कारणाशिवाय चिखलफेक केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतो, ही गोष्ट जगासमोर येणं खूप गरजेचं होतं”, असं शिल्पा म्हणाली.

याविषयी तिने पुढे सांगितलं, “ज्याप्रकारे माझा छळ सुरू होता, माझ्या जागी दुसरी कोणतीही स्वाभिमानी मुलगी असती, तर तिने जीवच दिला असता. मीसुद्धा चिठ्ठीवर नाव लिहून माझं आयुष्य संपवलं असतं, पण चार दिवसांनी सगळे मोकळे होतील आणि मला पुन्हा भित्री म्हटलं जाईल. मी अवाजवी कपडे आणि पैशांची मागणी केल्याचा खोटा आरोप माझ्यावर करण्यात आला होता. यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला. माझा ‘सिंटा’ या कलाकारांच्या संस्थेकडूनही अपमान झाला होता. अखेर वैतागून मी ती मालिका सोडली होती. बदनामी म्हणजे नेमकं काय आणि जेव्हा एखाद्या निरपराध व्यक्तीची प्रतिष्ठा खराब होते, तेव्हा त्याला किती वेदना होतात, हे कायदेशीररित्या स्पष्ट करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालं होतं. त्यावेळी माझ्याकडे याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in