• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचे प्रेमसंबंध, बायकोची सोडलेली साथ, पण…, पडद्यमागे नेमकं काय घडलेलं!

September 12, 2026 by admin Leave a Comment


Rohit Shetty Love Life : झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता रोहित शेट्टीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. आज रोहित त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रोहित शेट्टी यांचा संसार मोडेल… अशा स्थितीत होता. कारण रोहित याच्या अफेअरच्या चर्चा अभिनेत्री प्राची देसाई हिच्यासोबत रंगलेल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर, प्राची देसाई हिचा आज वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. प्राची 38 वर्षांची झाली आहे. टीव्ही विश्वातून अभिनय विश्वात पदार्पण करणाऱ्या प्राचीने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याच दरम्यान, प्राची आणि रोहित यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला…

17 व्या वर्षी प्राचीचं टीव्ही विश्वात पदार्पण…

प्राची देसाई हिचा जन्म 12 सप्टेंबर 1988 रोजी गुजरातच्या सुरत शहरात झाला. प्राचीला सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता आणि त्यामुळेच वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी अभिनेत्रीने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. प्राची सर्वप्रथम एकता कपूर यांच्या ‘कसम से’ या मालिकेत झळकली, जी 2006 मध्ये सुरू झाली होती. या मालिकेत प्राचीने अभिनेता राम कपूर यांच्यासोबत काम केलं, दोघांमध्ये 15 वर्षांचं अंतर आहे.

टीव्ही विश्वात स्वतःचं स्थान पक्क केल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडच्या दिशेने मोर्चा वळवला. 2008 मध्ये प्राची ‘रॉक ऑन’ सिनेमात झळकली, त्यानंतर
‘लाइफ पार्टनर’, ‘आई, मी और मैं’, ‘पुलिसगिरी’, ‘अजहर’, ‘रॉक ऑन 2’, ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुम्बई’, ‘बोल बच्चन’, ‘तेरी मेरी कहानी’ या सिनेमांमध्ये देखील प्राचीने महत्त्वाची भूमिका साकारली.

14 वर्ष मोठ्या रोहित शेट्टीसोबत अफेअर

रिपोर्टनुसार, प्राची आणि रोहित यांच्यामध्ये ‘बोल बच्चन’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान प्रेम बहरलं. तेव्हा रोहित शेट्टी विवाहित होता. पण प्राचीवर असलेल्या प्रेमासाठी दिग्दर्शकाने बायकोला देखील सोडलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर प्रेमाचा त्याग करत रोहित याने कुटुंबियांची निवड केली.

आता काय करतेय प्राची देसाई?

प्राची देसाई आता अभिनयापासून दूर असून तिच्याकडे सध्यातरी कोणता प्रोजेक्ट नाही. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घोर कलियुग! लग्नानंतरही बायको बॉयफ्रेंडच्या प्रेमात; नवऱ्याने दोघांचं मंदिरात लग्न लावून दिलं
  • Congress News : मुख्यमंत्री राहिलेल्या बड्या नेत्याने तडकाफडकी दिला काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा, नेमकं काय घडलय?
  • मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
  • Laxman Hake: आरक्षणावरून हुज्जत, लक्ष्मण हाके यांच्या अंगावर तरुण धावले, सोलापूरमध्ये घडलं काय?
  • Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा..; दिशा सालियानच्या वडिलांची सीबीआयकडे मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in