• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोटच्या मुलांनी सोडले वाऱ्यावर, आता त्या मातेला मिळाला आधार, टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट

September 10, 2026 by admin Leave a Comment


संतोष नलावडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : साताऱ्यात दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या आईला अखेर आधार मिळाला. शहरातील यशोधन संस्थेने या माऊलीला आधार दिला. रुक्मिणी भस्मे या मागील पाच दिवसापासून साताऱ्यातील एका मंदिरात राहत होत्या. दोन्ही मुले सोडून गेली तरी आईला अजूनही मुलांची आस दिसून आली. TV9 मराठी वर बातमी प्रसिद्ध झाल्यावर यशोधन अनाथ आश्रम संस्थेचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी रुक्मिणी भस्मे यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. जिल्हा प्रशासन संबंधित दोन्ही मुलांचा शोध घेत आहे.

काय आहे प्रकरण?

रुक्मिणी सदाशिव भस्मे या मुळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील रहिवासी आहेत. पतीच्या निधनानंतर त्या मुलांकडे राहत होत्या. त्यानंतर संसाराचा गाडा हाकणे जिकरीचे झाल्यावर त्या पाटण तालुक्यातील मुरूड या गावी आल्या. पुढे पोट भरण्यासाठी त्या दोन मुलांसह सातारा शहरात आल्या. गेल्या दहा वर्षांपासून विविध भागात भाड्याने खोलीत घेऊन हे सगळं राहत होते. रुक्मिणी यांच्या दोन्ही मुलांचे अजून लग्न झालेले नाही. पण एकाएक अगोदर मोठ्या घर सोडले, नंतर धाकटाही न सांगता निघून गेला. मुलांकडून घराच्या किरायापोटी मिळणारे दोन हजार रुपये ही बंद झाले. त्यामुळे रक्मिणी भस्मे यांना खोली सोडावी लागली. त्यांनी मग मंदिराचा आसरा घेतला.

मुलांसोबत राहण्याची आस

रुक्मिणी भस्मे या मंदिरात राहत असल्याची माहिती समोर आली. याविषयीची बातमी समोर येताच प्रशासनाने चक्रं फिरवली. त्यांचा लहान मुलगा हा होमगार्डमध्ये काम करत असल्याचे समोर आले. होमगार्ड अधिकाऱ्यांनी या मुलांचे समुपदेशन केले. आईला सांभाळण्यासाठी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मोठा मुलगा कुठं गेला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. तर आपल्याला मुलांसोबतच राहायचे आहे, असे आईने सांगितले. तिला अद्यापही तिच्या मुलांचीच काळजी दिसून आली. आता मोठ्या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मुलं अचानक घर का सोडून गेली हे समोर आलेले नाही. तर आता यशोधन अनाथ आश्रम संस्थेचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी या मातेला आधार देणार असल्याची माहिती दिली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या निशाण्यावर राज्य सरकार? MPSC प्रकरणात केली मोठी घोषणा
  • ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
  • मोठी घडामोड! संजय राऊतांकडून पहिल्यांदाच शिंदेंच्या मंत्र्याचं कौतुक; मनातलं सगळं सांगून टाकलं
  • Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी स्वरा भास्करला झापलं? नेमकं काय म्हणाल्या वाचा
  • Babanrao Taywade: कुणबी नोंदीत मोठा घोळ, एकच नाव पाच वेळेस? बबनराव तायडवाडे यांच्या दाव्याने खळबळ, सरकारकडे केली मोठी मागणी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in