• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानी क्रिकेटपटूवर कशी वेळ आली? सोशल मीडियावर मागितलं काम, म्हणाला…

September 11, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तान क्रिकेटला उतरती कला लागली आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानची सर्वच पातळीवर नाचक्की होत आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट दिवसेंदिवस रसातळाला चाललं आहे. इंग्लंड दौऱ्यातही पाकिस्तान संघाची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट आणि वाद हे समीकरण ठरलं आहे. आता असं असताना एक प्रकरण समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान संघाकडून टी20 खेळलेल्या डावखुरा वेगवान गोलंदाज सलमान मिर्झाने सोशल मीडियावरून स्वत:साठी काम मागितलं आहे. पाकिस्तानसाठी 17 टी20 सामने खेळलेल्या डावखुरा वेगवान गोलंदाज सलमान मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण असं करण्याचं कारण काय? त्यावर अशी वेळ का ओढावली? सविस्तर जाणून घेऊयात..

वेगवान गोलंदाज सलमान मिर्झाने काम मागितलं म्हणजे नोकरी वगैरे नाही. तर जे काम रोज करतो तेच मागितलं आहे. म्हणजेच गोलंदाजीसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करून याचं कारणही सांगितलं आहे. झालं असं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशांतर्गत स्पर्धा, प्रेसिडेन्स कपसाठी सहा वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. मात्र यात सलमान मिर्झाला काही स्थान मिळालेलं नाही. त्यामुळेच सलमान मिर्झाने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

Fast bowler Salman Mirza shares an update on missing the upcoming President’s Trophy Grade-1 (FC) due to a thumb fracture, confirming he is open and available if any department requires a replacement later in the season.#Cricket | #Pakistan | #SalmanMirza | #Lahore pic.twitter.com/gqhWvLwVDr

— Khel Shel (@khelshel) September 10, 2026

सलमान मिर्झाने पोस्ट करत सांगितलं की, ‘प्रेसिडेन्स ट्रॉफी ग्रेड 1 दोन दिवसात सुरू होणार आहे. मी यावेळेस कोणत्याही संघाचा भाग नाही. कारण नॅशनल चॅम्पियन्स कपदरम्यान बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर मी काही डिपार्टमेंटशी चर्चा केली. पण त्यांनी आधीच संघाची घोषणा केली होती. जर कोणत्याही संघाला या पर्वात पुढे जाऊन गोलंदाजाची गरज पडली तर मी तयार आहे. मी खेळू इच्छितो.’

सलमान मिर्झा टी20 कारकीर्द

सलमान मिर्झा 32 वर्षांचा असून पाकिस्तानसाठी 17 टी20 सामन्यात 23 विकेट काढल्या आहेत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान संघाचा भाग होता. पण चार सामन्यात त्याच्या खात्यात फक्त 4 विकेट आल्या. यानंतर इस्लामाबाद युनाइटेडसाठी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला होता. ऑगस्टमध्ये नॅशनल चॅम्पियनस कप स्पर्धेत दुखापत झाली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?
  • Ishan Kishan Injury : ईशान किशन खेळणार की नाही? सस्पेंस संपला; श्रेयस अय्यरने दिली मोठी अपडेट
  • Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच चुकूनही पाहू नका या गोष्टी, संपूर्ण दिवस जाईल खराब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in