
इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानने पागलपणा लावला आहे. युएईने पाकिस्तानला पैसे परत करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वेगवेगळ्या देशात भिकेचा कटोरा घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ फिरत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी करार घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचे खायचे वांदे आहेत. यादरम्यानच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ कतारला पोहोचले. त्यांचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जसे ही त्यांचे विमान कतारच्या एअरस्पेसमध्ये दाखल झाले, तसे एअरफोर्सच्या फायटर जेट्सला एस्कॉर्ट केले. शरीफ हे थेट विमानातूनच सलामी देताना दिसले. त्यांचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाचारगिरी नक्की किती पत्कारली पाहिजे, याची तूफान चर्चा होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
अनेकांनी मजाक उडवला आहे. कतारमध्ये शहबाज शरीफ यांचे सन्मापूर्वक स्वागत करण्यात आले दोहा एअरपोर्टवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी ते दाैऱ्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान सुरूवातीपासूनच पुढाकार घेत आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जगापुढे आपली इज्जत घातल्याचे बघायला मिळत आहे.
Prime Minister Muhammad Shehbaz Sharif received a grand welcome during his visit to Qatar
Escorted by Qatari fighter jets upon entering their airspace, the Prime Minister expressed gratitude to the Qatari leadership and pilots for the warm reception. pic.twitter.com/BXSdOnnN3k
— Shehbaz Digital Media (@ShehbazDigital) April 16, 2026
पाकिस्तानात इराण आणि अमेरिका युद्धाची शांतता करार बैठक झाली. पण या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकला नाही. बैठकीत यश न मिळाल्याने पाकिस्तानने थेट होर्मुज खाडीत नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडीत स्थिती भयंकर होत आहे. इराणचे जहाजही त्यांच्या बंदरातून बाहेर निघू शकत नाहीत. इराणकडून काही मुद्दे मान्य करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला.
Shehbaz Sharif didn’t even wait for the plane to land and started saluting Qatar while still in the air
This foolish clown has been kept by Asim Munir for exactly this purpose. pic.twitter.com/PSSGHU4UOH
— برهان الدین | Burhan uddin (@burhan_uddin_0) April 16, 2026
अमेरिकेचे अध्यक्ष शांतता करारानंतर पाकिस्तान दाैऱ्यावर जाण्याचे संकेत आहेत. पाकिस्तानला धक्का देत अमेरिकेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचेही सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर चांगला संवाद झाला. आमच्या सध्याच्या परिस्थितीवर 40 मिनिटे चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता शहबाज शरीफ कतारच्या दाैऱ्यावर आहेत. कतारमधून मोठ्या प्रमाणात भारतात एलपीजी गॅस आयात होतो. युद्धात कतारचेही नुकसान झाले आहे.



Leave a Reply