• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानच्या नादाला लागून बांगलादेशने मारून घेतला पायावर दगड, थेट मोठा निर्णय, भारतावर..

September 11, 2026 by admin Leave a Comment


बांगलादेश BRICS परिषदेच्या तोंडावर भारताला मोठा धक्का दिला. भारताचे निमंत्रण त्यांनी नाकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या नादाला लागून आपल्याच पायावर दगड मारून घेताना बांगलादेश दिसत आहे. यासोबतच चोराच्या उलट्या बोंबा म्हटल्याप्रमाणे भारतावरच आरोप करताना बांगलादेश दिसत आहे. भारताने दिलेले BRICS चे निमंत्रण बांगलादेशने नाकारले. उलट भारतावर आरोप करत बांगलादेशवर केले जात आहेत. बांगलादेश सरकारचे म्हणणे आहे की, भारताने बांगलादेशच्या पंतप्रधानांना व्यक्तिगत या बैठकीचे निमंत्रण दिले नाही. हे निमंत्रण BIMSTEC च्या सदस्याला फक्त देण्यात आले. बांगलादेशचे विदेश राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केला.

पंतप्रधान तारिक रहमान BRICS परिषदेमध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिलेच नाही. त्यामुळे सरकारकडून कोणाला पाठवण्याचाही प्रश्न येत नाही. हुमायूं कबीर यांनी म्हटले की, आम्ही कसे जाणार. बांगलादेश सरकारकडून कोणाला आमंत्रित करण्यात आले? आमच्या पंतप्रधानांना निमंत्रण नाही. पत्रकारांनी म्हटले की, तुम्हाला निमंत्रण पाठवण्यात आले.

यावर उत्तर देताना कबीर यांनी म्हटले की, तुम्हाला कोण म्हटले आम्हाला निमंत्रण पाठवण्यात आले. त्यांनी आमच्या पंतप्रधानांना निमंत्रण दिले का? BIMSTEC च्या सदस्यांना त्यांनी आमंत्रित केले. त्यानंतरही तुम्ही तोच प्रश्न विचारत आहेत. भारताने स्पष्ट केले की,BIMSTEC च्या सदस्य देशांना आम्ही या परिषदेसाठी निमंत्रण दिले. भारत आणि बांगलादेश यांच्यात काही वादाचे मुद्दे आहेत. शेख हसीना यांना भारतात राहण्याची परवानगी भारताने दिल्याचे हे संबंध अधिकच तणावात आहेत.

पाकिस्तान आणि चीनच्या अधिक जवळ जाताना बांगलादेश दिसत आहे. स्थिती अधिक गंभीर होताना दिसत त्यातच भारताचे निमंत्रण बांगलादेशने नाकारले आहे. बांगलादेश उलट भारतावरच आरोप करताना दिसतोय. भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात दाखल झाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग देखील भारतात येणार आहेत. उद्यापर्यंत जिनपिंग भारतात येतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोहन भागवत यांना प्रायश्चित घ्यावं लागेल… संजय राऊत असं का म्हणाले? काय घडलं?
  • 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचा निर्णय घेणार? रिपोर्ट समोर
  • Bigg Boss 20: लज्जास्पद, मेरी कोम यांच्यावर भडकले नेटकरी; मनोज तिवारी यांच्या मुलीबद्दल अशी टिप्पणी
  • Igatpuri News : फेरफार नोंदीत अनियमितता उघडकीस; एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित; प्रशासनात खळबळ
  • QR कोड स्कॅन न करता करा पेमेंट! UPI चे नवीन टॅप अँड पे फीचर कसं काम करणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in