• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात ‘त्या’ जमिनवादावरुन पोलिसात तक्रार, नवं प्रकरण काय?

April 27, 2026 by admin Leave a Comment


ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मीरा-भाईंदर परिसरातील एका भूखंडाच्या व्यवहारावरून हा वाद उफाळल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात सरनाईकांवर मोठ्या प्रमाणात जमिन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांनी आरोप केला की, संबंधित भूखंडातील काही भाग बळकावण्याचा प्रयत्न झाला. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली असून पोलीस ठाण्यातही धाव घेतली आहे. यावेळी सरनाईकांच्या समर्थकांनी भूमिपूत्रांच्या २ हजार ४३९ चौ. मीटर क्षेत्रापैकी १ हजार २१९ चौ. मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बळकावली असल्याचा आरोप केला आहे. परिवहन मंत्र्यांना जेव्हा या विषयी विचारलं तेव्हा त्यांनी बोलणं टाळलं.

या संपूर्ण घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयपीएल स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्सकडून नव्या खेळाडूचा शोध, मुंबईच्या अष्टपैलूची घेतली चाचणी
  • टाकीचे पाणी तापतेय? गच्चीवर करा ‘हे’ 3 बदल आणि दुपारच्या वेळीही मिळवा थंडगार पाणी
  • वयाच्या 14 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात, सासरी सहन केलेला छळ, यातना, 450 सिनेमांमध्ये काम करण्याऱ्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत
  • फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही? मग या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा
  • Cricket : अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in