• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो – देवेंद्र फडणवीस

September 11, 2026 by admin Leave a Comment


मागच्या टीमने चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन. नवीन टीमचे स्वागत आहे. नवीन टीमने अनेक मागण्या केल्या आहेत. मागच्या टीमने एक बिल्डिंग मागितली होती ती झाली. नवीन टीमने सगळं नवीन कोर्ट मागितले आहे. नक्कीच नागपूर महत्वाचं ठिकाण आहे त्यामुळे नवीन कोर्ट आवश्यक आहे, कारण जून्या कोर्टमध्ये जागा कमी पडत आहे ही मागणी पूर्ण होईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. नागपूर बार असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की गवई साहेब म्हणाले मी माजी झालो त्यामुळे फक्त विनंती करू शकतो, पण गवई साहेब तुम्ही आम्हाला मागणी केली ती सर न्यायाधीश यांची मागणी म्हणून पाहतो असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की किलोर साहेब यांनी निवडणूक लढतानाच्या अनेक अडचणी सांगितल्या. मग आमच्या समोर दर पाच वर्षांनी काय अडचणी येत असतील हे समजू शकता. आम्ही निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो.

न्यायालयाच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा होत आहेत. त्यात आणखी बदल होईल. नवीन बॉडीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी माजी सर न्यायाधीश आले यातून तुम्ही किती महत्वाचे आहे, हे महत्वाचे आहे. गवई साहेब यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आमच्याकडे विरोधी पक्ष नेता असतो, त्याप्रमाणे तुमच्याकडे नसेल अशी अपेक्षा करतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

कोर्टाची नवीन बिल्डिंग व्हावी ही मागणी 2015 मध्ये झाली होती, त्यावेळी ती बिल्डिंग पूर्ण झाली होती,आता नवीन मागणी आहे, देवेंद्रजी यांच्याकडे. आपल्याला डिमांड करावी लागत नाही, सूचना दिली तरी ते काम पूर्ण करतात असे यावेळी माजी सर न्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

मी सर न्यायाधीश असताना मी देवेंद्रजी सोबत अनेक कामांना उपस्थित होतो त्यांनी अनेक कामे केली, टीकाकार टीका करतात, पण काम केलं ते दिसते. त्यांनी कधी कामासाठी लागणाऱ्या पैशाची कमी होऊ दिली नाही. कोल्हापूर खंडपीठ तयार झाले, त्यातून अनेकांना न्याय मिळाला आहे. मागण्या अनेक होतात, त्या हनुमानाच्या शेपटी सारख्या असतात. पण मुख्यमंत्री यांनी या मागण्या होण्याआधीच या विषयी प्लॅनिंग केलं आहे.

न्यायमूर्तीच्या निवृत्तीचे वय वाढण्याविषयी काहीतरी सुरू आहे. देवेंद्रजी कुठे असतील ते सांगता येत नाही. आपल्याकडे अनेक गोष्टी ऐकायला येतात. वकील हा सोशल इंजिनिअर असतो असेही माजी सर न्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले.

 

माणूस आमदार, खासदार अनेक वेळा होऊ शकतात. पण डिस्ट्रिक्ट बार असोशियनचा अध्यक्ष दुसऱ्यांदा होणे कठीण आहे. मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा मला चांगला अनुभव आला. व्होट मागतानाचे अनेक किस्से यावेळी न्यायमूर्ती किलोर यांनी सांगितले. या संघटनेचा अध्यक्ष होणे मोठी जबाबदारी असते. एक जबाबदारी आपल्यावर आहे ती म्हणजे सिनिअर वकिलांना ज्युनिअर वकिलांनी मान देणे असेही ते म्हणाले.

मी अनेक प्रयोग वकिलांच्या बाबतीत केले. इंग्रजी चांगलं असणं, एवढंच वकिलांसाठी महत्वाचं नाही. जो माणूस वकिलांना पैसे देऊ शकत नाही, अशा लोकांना न्याय मिळवून देणे महत्वाचं आहे. जी मागणी न्यायालय सुविधा बाबत केली ती पूर्ण होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री समजदार आहेत. त्यांना आपली काळजी आहे त्यामुळे मागणी पूर्ण करणे हे त्यांना माहीत आहे असेही अनिल किलोर यावेळी म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो – देवेंद्र फडणवीस
  • 80s रेट्रो ट्रेंड झाला जुना, आता AI ने फोटोला राजस्थानी शाही घराण्याचा लुक्स द्या, या 5 Prompts मदतीने तुमचे रुप बदला…
  • Modi-Putin Meet 2026 : पंतप्रधान मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास आहे?
  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in