• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

धारावीत मध्यरात्री काय घडलं? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…

June 14, 2026 by admin Leave a Comment


मुंबईतील धारावीमध्ये सध्या तोडक कारवाई सुरु आहे. या तोडक कारवाईवरून आणि वाढत्या दहशतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “धारावीत सध्या अत्याचार सुरू असून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी मेहनतीने उभारलेल्या सामाजिक संस्था, व्यायामशाळा आणि मैदानांवर मध्यरात्री गुंडांच्या मदतीने बुलडोझर चालवला जात असल्याचा दावा करत, धारावीत अदानींकडून गुंडगिरी आणि दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.

धारावीत अत्याचार सुरु आहे. त्याविरुद्ध आम्ही लढा देत आहोत. परवा रात्री एका नगसेवक आले त्यांची व्यायामशाळा तोडली. काहीही कारण नव्हत आता तर शाळा आणि मैदानही ताब्यात घ्यायचे आहे. या सर्व संस्था प्रॉफीट मेकिंग संस्था नाहीत. त्या आमचे काही नगरसेवक स्वखर्चातून चालवतात. अशा पद्धतीने धारावीत हाहाकार माजला आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. मराठी माणसाच्या काळजात कट्यार खुपसणारा हा विषय आहे. उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व धारावी यासाठी वाचावायला सांगत आहोत. रात्री अपरात्री तुम्ही सामाजिक संस्थांवर बुलडोजर चालवता, म्हाडा, पोलीस काय करायला तयार नाही. आम्ही काही केलं नाही असं म्हणतात, मग हे कोण करतंय.

धारावी ताब्यात घेण्यासाठी यांनी गौतम अदानींनी गुंडाच्या फौजा वाढवल्यात का की अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात. या सर्व गुंडांची नावे माझ्याकडे आली आहेत. मी पोलिसांना त्या देणार आहे. आता मी उद्धव ठाकरेंशीही बोलन. खासदारांशीही आज बोलणार आज.

ज्या संस्था कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनतीने उभ्या केल्या त्यावर तुम्ही मध्यरात्री गुंडोसोबत बुलडोजर चालवतात. सरकार आणि कायदा सुव्यवस्था कुठे आहे. मोदी फ्रान्सला गेलेत. आता अदानी तिथे एखादी डील करायला जातील. तुम्ही हे सर्व घ्या. पण गरीबांची धारावी का गिळताय. मराठी माणसांच्या संस्थांवर का बुलडोजर चालवतात, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि नगरसेवक यांनी अदानीला प्रश्न विचारा हा तुझा मराठी माणसाला उदध्वस्त करण्याचे जे कारस्थान सुरु आहे हे कोणासाठी सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Murder Case : सिया गोयलची पोलिसांसमोर मोठी कबुली, अखेर ते गुपित सांगितलंच; म्हणाली – मी केतनला …
  • मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद
  • MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..
  • Supriya Sule : शरद पवार पक्षाचे आमदार फुटणार का? राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in