• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

देवेंद्र फडणवीस केंद्रात शिक्षणमंत्री होणार? राज ठाकरेंनी दिले एका वाक्यात उत्तर

July 25, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीकडून दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता देशाला नवीन शिक्षणमंत्री मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपद दिले जाऊ शकते असे विधान केले आहे. त्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री ?

आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिक्षणमंत्री बनवले जाऊ शकते याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलता राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘त्यांच्यात चुरस सुरू आहे. शिंदे आली की फडणवीस जातात. फडणवीस गेल्यावर शिंदे जातात. आताच्या परिस्थितीत का गेले त्यावर तेच सांगू शकतील.

उद्या आंदोलन होणार

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी उद्या मुंबईत आंदोलन केले जाणार आहे. यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘शिवाजी पार्क मैदानात वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ असेल. तिथेच जमणार आहोत. तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. एका वाक्यात सांगायचं तर जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला जमिनीवर आणलं आहे. मला वाटतं हा खूप मोठा विजय तरुणांचा आहे. त्यात दीपकेंचा मोठा वाटा आहे. कोणत्याही गोष्टीला मस्तवाल उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशात उभं राहिलं. त्याचा जल्लोष झाला पाहिजे.’

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘मी कालच म्हटलं होतं हा राग प्रधानावरून पंतप्रधानावर गेला आहे. यापुढचे काही निर्णय दीपके घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यांनीच निर्णय घ्यावा. त्यांनीच या गोष्टी सुरू केल्या आहेत. आमचा पाठिंबा असेल.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in