• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘दुसरी जया बच्चन’ म्हणणाऱ्यांना तापसी पन्नूचं सडेतोड उत्तर; म्हणाली – ही तुलना..

September 10, 2026 by admin Leave a Comment


कॅमेरा दिसताच हसणं आणि प्रत्येक पापाराझीशी दरवेळेस प्रेमाने, हसून-खेळून बोलणं हे प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीला जमतच असं नाही ! बॉलिवूडमध्ये एक नाव असंही आहे, ज्यांजं वागणं पाहून पॅप्स बऱ्याचदा घाबरतात. कारण ती व्यक्ती कोणालाही फटकाराताना जागा, स्थळ, काळ असं काहीही बघत नाही. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) . आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक बोलण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचं बऱ्याचदा पापाराझींशी वाजतं, त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अनेक नेटकरी आणि पापाराझींनीही तिला ‘दूसरी जया बच्चन’ किंवा ‘जया बच्चन लाइट’ असं म्हणत टीकास्त्रही सोडलं आहे. मात्र जया बच्चन यांच्याशी होणाऱ्या या तुलनेवर तापसीने अखेर मौन सोडलं. न्यूज 18 शी बातचीत करताना तिने यावर प्रतिक्रिया दिली.

जया बच्चन यांच्याशी होणारी तुलना, त्यामुळे वाईट वाटत नाही, उलट ती मला एक कॉम्प्लिमेंट वाटते, असं तापसीने थेट सांगितलं. पुढे तिने जया बच्चन यांचं कौतुक करत त्या अतिशय उत्तम अभिनेत्री आणि ‘सॉलिड वुमन’ आहेत, असंही म्हटलं. माझी त्यांच्याशी (जया बच्चन) तुलना करून लोकं खूपच मेहेरबान होतायंत, असंही तापसी पुढे म्हणाली.

मला माझ्या मर्यादा माहीत आहेत

पापाराझींशी होणाऱ्या वादावरूनही तापसीने स्पष्टीकरण दिलं. मी कोणावरही आवाज उठवलेला नाही, ना कोणाला शिव्या दिल्या, मला माझ्या लिमिट्स, माझ्या मर्यादा नीट माहीत आहेत, असं तापसीने सांगितलं. जेव्हा एखाद्या महिलेल तिच्या लिमिट्सची जाणीव असते, ते दुसऱ्यांसाठी थोडं घाबरवणारं असू शकतं, असही तिने नमूद केलं.

पापाराझींचं ते वागणं आवडत नाही

योग्य अयोग्य काय याची मला पूर्णपणे जाणीव आहे, आणि पापाराझींना बहुतेक तेच आवडत नसावं. अनेकदा पापाराझी आपल्यावरच ओरडतात असा दावाही तापसीने केला. पण त्यांचं हे वागणं आपल्याला आवडत नाही, असं ती म्हणाली. मी मोठी झा्लायवर माझ्या आई-वडिलांशिवाय इतर कोणीही आत्तापर्यंत माझ्यावर ओरडलेलं नाही. पण जेव्हा पापारझी वारंवार माझं नाव घेऊन ओरडत असतात, ते नागणं मला अजीब वाटतं. कॅमेरा घेऊन जर कोणी माझ्या अगदी नजीक उभं आहे, तर आसावेळेस ओरडण्याची गरज तरी काय ? असा सवालच तापसीने थेट विचारला.

तापसी आणि पापाराझींमधील वाद काही नवीन नाही. 2022 मध्ये ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तापसी उशिरा आल्याची तक्रार पापाराझींनी केली होती. त्यावर तामला ज्या वेळेची माहिती देण्यात आली होती, त्याच वेळेला मी पोहोचले, असं तापसीने सांगितलं. पुढे तिने फोटोग्राफर्सना नीट आणि सभ्यपणे बोलण्यास सांगितलं होतं. यानंतर तापसीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

कॅप्शनचा उपयोग फक्त क्लिकबेल्टसाठी

मी जेव्हा खरंच रागात असते तेव्हा माझी प्रतिक्रिया खूप वेगळी असते, असं तापसी पुढे म्हणाली. रागात असल्यावर मी एकदम गप्प होते आणि ज्याच्यावर नारााज आहे त्याच्याशी बोलणंच बद करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओंसोबत लावण्यात येणाऱ्या ‘रागावली’ किंवा ‘भडकली’ अशा कॅप्शन्स मला आवडत नाहीत, असं तापसीने स्पष्ट केलं. तिच्या म्हणण्यानुसार, अशा कॅप्शन फक्त क्लिकबेटसाठी वापरल्या जातात. एखाद्या व्हिडिओसोबत ‘तापसी प्रेमाने भेटली’ किंवा ‘तिने चांगल्या पद्धतीने संवाद साधला’ असं लिहिलं, तर कदाचित लोक त्यावर क्लिक करणार नाहीत. मात्र, कॅप्शनमध्ये अभिनेत्री रागवल्याचं लिहील्यावर लोकांच इंटरेस्ट वाढतो असा दावा तिने केला.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘दुसरी जया बच्चन’ म्हणणाऱ्यांना तापसी पन्नूचं सडेतोड उत्तर; म्हणाली – ही तुलना..
  • मराठा मोर्चा मुंबईत धडकणार, राज्य सरकारची पहिली सावध प्रतिक्रिया… मनोज जरांगेंच्या घोषणेनंतर विखे पाटील म्हणाले काय?
  • 80च्या ट्रेंडमुळे चर्चेत आलं 45 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येकाचं आवडतं
  • Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
  • Suraj Chavan : ‘गुलिगत स्टार’चं पारंपारिक पद्धतीने स्वागत, सूरज चव्हाणच्या लेकीचा खास व्हिडीओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in