• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दिवा-मुंब्रा वळणावर लोकलमधून महिला खाली पडली; सकाळच्या गर्दीच्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

September 10, 2026 by admin Leave a Comment


दिवा-मुंब्रा वळणावर सकाळच्या वेळेत एक महिला लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची मोठी घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 7.56 वाजताची गाडी वळणावर थांबली होती, त्याचवेळी महिला ट्रेनमधून खाली पडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

दिवा ते मुंब्रा या वळणावर एक मोठी घटना घडली. एक महिला ट्रेनमधून खाली पडली. ट्रेनमध्ये मोठी गर्दी असल्याने ही महिला खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. 7.56 ची डोंबिवली सीएसएमटी ही गाडी दिव्यावरुन पुढं जात होती. यावेळी सिग्नल असल्याने गाडी मध्येच एका वळणावर थांबली. दरम्यान, गाडीत जास्त गर्दी असल्याने या वळणावर गाडी थांबल्यानंतर ही महिला खाली पडली आहे. दरम्यान, तिच्याआधी एक महिला स्वतःहून खाली उतरली होती. त्यानंतर ट्रॅकवरुन चालत काही महिला मुंब्रा स्टेशनकडे गेल्याचं पाहायला मिळालं. सदरील महिलेला किती दुखापत झाली वगैरै याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, मुंबईकरांना सकाळी सकाळी लोकलमध्ये किती गर्दीचा सामना करावा लागतो, याबद्दल एक मुंबईकरच चांगल्याप्रकारे सांगू शकतो. जीवाची पर्वा न करता ऑफिसला वेळेत पोहोचण्याचं मोठं कसब मुंबईकरांकडे आहे. पण याचवेळी अनेकदा नको ते अनर्थ घडतात. अपघात घडतात. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. लोकलमधून प्रवास करुन मुंबईतील चाकरमानी कामाला पोहचत असतात. पण आता सेंट्रल लाईनवर मोठी घटना घडली आहे. ट्रेन गर्दीने तुडूंब भरलेली होती. महिलेला ट्रेनच्या आतमध्ये शिरता येत नव्हते. त्याचवेळी ती गडबडली आणि खाली पडली, असं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

या घटनेनंतर आता स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या लोकलचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. काही महिन्यांआधीच पहिली लोकलही दाखल झाली आहे. पण सध्या सगळ्या लोकल स्वयंचलित दरवाज्याच्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रश्न कधीपर्यंत मार्गी लागणार याकडे लक्ष लागलेलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्राकाटाऊ ज्वालामुखीजवळ गेलेली स्पीडबोट बेपत्ता; 5 पत्रकारांचा शोध सुरू
  • रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
  • Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले…
  • Apple ने दिला जोर का झटका, iPhone 17 किंमतीत अचानक केली वाढ
  • दिवा-मुंब्रा वळणावर लोकलमधून महिला खाली पडली; सकाळच्या गर्दीच्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in