• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तोतया IAS अधिकारी तृप्ती सिंहचे धक्कादायक कारनामे; युपीएससीची लिस्ट एडिट केली आणि…

September 12, 2026 by admin Leave a Comment


स्वतःला आयएएस अधिकारी सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तृप्ती सिंह या तोतया महिला अधिकाऱ्याबाबत भोपाळ पोलिसांच्या तपासात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता तृप्ती सिंह गोविंदपुराच्या एसडीएमपदी नियुक्ती झाल्याची पुष्टी करणारा एक बनावट दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. तोतया आयएएस तृप्ती सिंह प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. तृप्तीने 2025 च्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत फेरफार केला होता. या यादीत प्रत्यक्षात निवड झालेल्या नमन गोयल या उमेदवाराच्या नावाऐवजी तिने स्वतःचे नाव एडिट करून टाकले होते. या बनावट निकाल यादीचा आणि एआयच्या मदतीने तयार केलेल्या खोट्या कागदपत्रांचा वापर करून तिने 13 एप्रिल 2026 रोजी भोपाळमधील गोविंदपुरा येथे आपली एसडीएम म्हणून नियुक्ती झाल्याचा खोटा दावा केला होता.

तोतया आयएएस तृप्ती सिंह हिला कायद्याची काहीच भीती नव्हती, असं तिच्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. कारण तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःला अधिकारी भासवत वेगवेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या बदल्यात तिने कोचिंग संचालकांकडून लाखो रुपये उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

UPSC_List

पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, तोतया आयएएस तृप्ती सिंह विरोधात भोपाळमध्ये आतापर्यंत चारहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोपाळचे एडीसीपी शैलेंद्र सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार तृप्ती सिंगवर मध्य प्रदेश पर्यटन विभागामार्फत हॉटेल भाड्याने देण्याच्या नावाखाली सिवनी येथील रहिवासी गगन उपवंशी यांच्याकडून 50 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे, तिने बालाघाट येथील रहिवासी रोहित लिलहारे यांची 39 लाख रुपयांची फसवणूक केली होती.

Fake_Posting

तोतया आयएएस अधिकारी आणि या रॅकेटमध्ये तृप्ती सिंह एकटी नाही. तिला या गुन्ह्यात भाऊ प्रखर सिंग आणि ड्रायव्हर भुपेंद्र यांचीही साथ मिळाली. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर तुरूंगात पाठवलं आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेश विधानसभेत तृप्ती सिंहचा दोन तरूणींसोबत एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या तिच्या मैत्रिणी असल्याचं बोललं जात आहे. आता प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. यात काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer : मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय? मराठा आरक्षण आंदोलनात काय मिळणार?
  • Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच
  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in