• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तू आमदार महालेंच्या भरोषावर उड्या मारतो का… भाजप नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न

September 10, 2026 by admin Leave a Comment


बुलढाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. बुलढाण्यातील भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. देवीची आरती सुरू असताना निखील शर्मा याने ‘तू आमदार महालेंच्या भरोषावर उड्या मारतो का, मर्डर काय असतो तुला दाखवताच, तुझा आदेश आलाय.. असे म्हणत तलवार आणि बंदुकीने हल्ल्याचा प्रयत्न केलाय. बुलढाणा शहरातील कारंजा चौक परिसरात ही घटना घडलीय. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, आकाश दळवी आणि सोबतच्या मित्राला शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निखिल शर्मा, आर्यन निखिल शर्मा आणि वंश निखिल शर्मा यांनी शिवीगाळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.. यासंदर्भात पोलिसात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .. सोबतच दहशत माजवणाऱ्या आरोपींवर तडीपारची कारवाई करावी अशी मागणी दळवी यांनी केलीय.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड प्रकरणात आरोग्य उपसंचालक, सिव्हिल सर्जनसह पाच अधिकारी निलंबित करण्यात आले. दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई मात्र केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष. चौकशी समितीच्या अहवालावर अनेक मोठे प्रश्न; सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत अभियंता रडारवर. उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अमरावती दौऱ्यावर आहेत यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार.

चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची देखील मागणी. फायर अलार्म त्रासदायक वाटल्याने सिस्टीम बंद केली चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्याचे कळतंय. जालना जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत 95 लाख रुपयाचा गुटखा जप्त केला, जालना भोकरदन रोडवरील राजुर गणपती येथे एका गोडाऊन वर हा घोटक्याचा ट्रक खाली होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर सापळा रचून पोलीस अधीक्षकांचे पथक आणि हसनाबाद पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करत हा गुटखा जप्त केलाय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना जरांगे यांचे स्पष्टच उत्तर, संकटात असताना….
  • टीम इंडिया ज्या ठिकाणी खेळणार, तिथेच आले महाभंयकर संकट, थरकाप उडवणारा Video समोर
  • मैत्रिणीशी बोलला… रात्री अचानक ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि… MPSCच्या विद्यार्थ्याचं अपहरणाने पुणे हादरलं
  • Manoj Jarange: आता माघार नाहीच, मुंबईला जाणाराच, मुहूर्त कोणता? मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
  • देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे, आधुनिक फिल्म सिटी उभारणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in