• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधून दर महिन्याला किती व्हायची गोलीची कमाई ? आता थेट Youtuber

September 12, 2026 by admin Leave a Comment


छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रदीर्घकाळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. 2008 साली सुरू झालेल्या या मालिकेचा प्रवास आजही सुरू आहे. या मालिकेने अनेक कलाकारांना घराघरात ओळख मिळवून दिली. काही कलाकार सुरुवातीपासून मालिकेसोबत आहेत, तर काहींनी कालांतराने शोला निरोप दिला.

अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता कुश शाह. मालिकेत त्याने ‘गोली’ ही भूमिका साकारली होती. 2008 पासूनच तो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा भाग होता आणि त्याच्या विनोदी अंदाजामुळे ‘गोली’ हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरलं होते. मात्र, 2024 साली कुशने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर अभिनेता धर्मित तूरखिया हा ‘गोली’च्या भूमिकेत दिसतोय.

मात्र तारक मेहता मालिकेतून बाहेर पडल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी कुश शाह पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी त्याने अभिनयाऐवजी डिजिटल जगात नवा प्रवास सुरू केला आहे. कुशने स्वतःच्या नावाने ब्लॉगिंग आणि कुकिंग YouTube चॅनेल सुरू केलं असून, त्याचा पहिलाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मुळे कुशला मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे YouTube चॅनेल सुरू करताच त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, मालिकेत काम करत असताना कुशला एका एपिसोडसाठी जवळपास 20 हजार रुपये मानधन मिळत होते.

‘गोली’ हे त्याचे नियमित पात्र असल्याने महिन्यातील सुमारे 26 एपिसोड्सचा विचार केला, तर त्याची मासिक कमाई जवळपास 5.20 लाखांच्या आसपास होत असेल, असं सांगितलं जातं. मात्र आता अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर कुशने YouTubeच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा नवा मार्ग निवडला.

विशेष म्हणजे, चॅनेल सुरू केल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच त्याच्या YouTube चॅनेलने 40 हजारांहून अधिक सब्सक्राइबर्सचा टप्पा पार केला. एवढंच नव्हे, तर त्याच्या पहिल्याच व्हिडिओला 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे कुशच्या नव्या प्रवासालाही चाहत्यांकडून तितकंच प्रेम मिळतंय. गेल्या पाच वर्षांपासून मी स्वतःचे YouTube चॅनेल सुरू करण्याचा विचार करत होता, असं कुशने सांगितलं. अखेर आता त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात आणत पहिला व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आणला. अभिनयाच्या क्षेत्रात लोकप्रियता मिळवल्यानंतर आता YouTubeवर कुश शाह किती यशस्वी ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!
  • जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
  • Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in